बुलडाणा,दि.19 - पोलीस कायदा व सुव्यवस्था सांभाळत नागरिकांना भयमुक्त जीवन देण्यासाठी प्रयत्न करतात. गुन्हेगारी कमी होवून नागरिकांना गुन्हाच न घडविण्याची परिस्थिती निर्माण करण्यासाठीसुद्धा पोलीस विभागा कार्य करतो. पोलीसांची प्रतिमा समाजात घडणाऱ्या गुन्हेगारीवर आणि गुन्हा सिद्थतेवर अवलंबून असते. माहिती व जनसंपर्क विभागाच्या लोकराज्य मासिकाने जानेवारी 2018 चा अंक ‘आपले पोलीस -आपली अस्मिता’ या विषयावर काढून पोलीसांचे ‘रिअल वर्क’ समाजापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला आहे. हा निश्चितच स्पृहणीय आहे, असे गौरवोद्गार जिल्हा पोलीस अधिक्षक शशीकुमार मीना यांनी आज केले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने जानेवारी 2018 चा लेाकराज्य अंक स्मार्ट, समर्थ, संवेदनशिल ‘आपले पोलीस - आपली अस्मिता’ या विषयावर प्रकाशित करण्यात आला आहे. या अंकाचे प्रकाशन जिल्हा पोलीस अधिक्षक शशीकुमार मीना यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक संदीप डोईफोडे, जिल्हा माहिती सहाय्यक नीलेश तायडे, सहायक पोलीस निरीक्षक सचिन परदेशी आदींसह कर्मचारी उपस्थित होते.जिल्हा पोलीस अधिक्षक यावेळी म्हणाले, लोकराज्यच्या या अंकात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, महिला व बाल सुरक्षा, सायबर गुन्हे, सुरक्षित वाहतुक, दहशतवाद व नक्षलवादाचा बिमोड, या विषयी अतिशय उपयुक्त माहिती आहे. ती सर्वसामान्य नागरिकांना सुध्दा उपयोगाची आहे. पोलिस विभागासाठी असलेल्या योजना , पोलिसांना उच्च शिक्षणाची संधी, सायबर क्राईम म्हणजे नक्की काय? सायबर गुन्हयाचा पाठलाग, सायबर युगाची आव्हाने, गुन्हे सिध्दीचे शास्त्रीय तंत्र, या बाबतची माहिती हे या अंकाचे वैशिष्टय आहे.पोलीसांसाठीच नव्हेतर सर्वासामान्य नागरिकांसाठी हा अंक संग्राहय ठेवण्यासारखा आहे. यामध्ये महाराष्ट्र पोलीस सिटिजन पोर्टल बाबत माहिती दिली असून हे डाऊन लोड करुन आता नागरिकांना घरूनच पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविता येऊ शकते. या ई- तक्रारीवर झालेल्या चौकशीची माहितीसुध्दा एस.एम.एस. व्दारे तक्रारदारास प्राप्त होते. त्यामुळे नागरिकांनी हे डाऊनलोड करुन घ्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. लोकराज्यचा हा अंक सर्व बुक स्टॉलवर उपलब्ध आहे.
Author: Moeez Shaikh
Related Posts
Some simillar article from this label, you might also like
- Blog Comments
- Facebook Comments
Subscribe to:
Post Comments (Atom)

