इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा शहरातील प्नभाग क्रं.10 मधील मातंग समाजाच्या समाजमंदिराची दुरुस्ती करावी अशा मागणीचे निवेदन शहरातील लहुजी शक्ती सेना यांच्यावतीने गरपंचायतच्या मुख्याधिकारी सोनम देशमुख यांना दिले आहे.या निवेदनात म्हटले आहे कि,या समाजमंदिराची डागडिजी करण्यात यावी अशी मागणी फेब्रुवारी 2017 मध्ये केली होती.मागणी करुनही या एक वर्षाच्या कालावधीत प्रशासनाने हे काम केले नाही.तरी प्रशासनाने याकडे लक्ष देवुन समाजमंदिराची दुरुस्ती लवकरात लवकर करावी,अशी मागणी निवेदनात केली आहे.यावेळी या समाजमंदिराची दुरुस्ती लवकर करुन घेवु असे आश्वासन मुख्याधिकारी सोनम देशमुख यांनी दिले.
यावेळी लहुजी शक्ती सेना शहरध्यक्ष दिपक प्रकाश रोडगे,शाम रोडगे ,बालाजी कसबे,अक्षय सगट,विष्णू मिसाळ,अभिजित सगट,सचिन रोडगे,रवि पवार, लक्ष्मण सगट,अदि उपस्थित होते.
