लोहारा/प्रतिनिधी
लोहारा शहरातील ब्रम्हकुमारी ईश्वरी विश्व विद्यालयाच्या वतीने दि.26 फेब्रुवारी रोजी शिव संदेश देण्यासाठी रॅली काढण्यात आली.या भव्य रँलीत महीला डोक्यावर कलश घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. शहरातील भारत माता मंदीरापासुन या रॅलीस सुरवात करण्यात आली.हि रँली डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे ब्रम्हकुमारी ईश्वरी विश्व विद्यालया पर्यत काढण्यात आली.व या रँलीत शहरातील न्यु व्हिजन इंग्लिश स्कुलचे व तालुक्यातील हराळी येथील ज्ञानप्रबोधनीचे विद्यार्थी ही सहभागी झाले होते.यानंतर शिव संदेश देणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी नगरध्यक्षा पोर्णिमा जगदिश लांडगे,बी.के.राजयोगिनी सोमप्रभा बहनजी,शामचैतन्य महाराज,पो.नि.सर्जेराव भंडारे, रेवनसिध्द भाई,बाबुराव पुजारी,ब्रम्हकुमारी सरीता दीदी,उस्मानाबाद संचालिका ज्योती बहनजी,राणी बहनजी,तुकाराम मस्के,मुरुमचे माजी नगरध्यक्ष लिमये,रोहीदास भाई,बेडगे भाई,रामपुरे भाई,राजेंद्र कदम,राजयोगी ब्रम्हकुमार राजुभाई,रतनभाई याच्यासह आदीची प्रमुख उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सरीता दीदी यांनी केले.तर आभार राजु भाई यांनी मानले. यावेळी महीला मोठ्यासंख्येने उपस्थितीत होत्या.
