इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने लोहारा तालुक्यातील लोहारा (खुर्द) येथील युवक नेताजी आरगडे (वय35) याचा खुन झाला असल्याची घटना दि.30 ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली होती. याबाबत लोहारा पोलीस ठाण्यात मयताच्या पत्नीसह तिघा आरोपींना अटक करुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.या खुनाच्या घटने मधील आरोपी मयताची पत्नी महादेवी नेताजी आरगडे,हणमंत रसाळ,भरत रसाळ,प्रभाकर रसाळ,यां चौघांना लोहारा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दि.5 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी दिली असल्याची माहीती उपविभागीय पोलीस अधिकारी आर.आर.धस यांनी दिली.
