Showing posts with label अकोला. Show all posts
Showing posts with label अकोला. Show all posts
जनजागृतीच्या माध्यमातून महिला व बालकांवरील अत्याचारांवर नियंत्रण शक्य :  जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे

जनजागृतीच्या माध्यमातून महिला व बालकांवरील अत्याचारांवर नियंत्रण शक्य : जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे

 


अठरा वर्षाखालील मुले आणि मुलींनी दुचाकी वाहने   चालवणे कायद्याने गुन्हा.

मुर्तीजापुर : महिला व बालक यांच्यावर होणारे अत्याचार जनजागृतीच्या माध्यमातून नियंत्रणात आणणे शक्य आहे. महिला व बालक सुरक्षा व सुरक्षात्मक उपाययोजना करीता सर्वांनी सजग राहावे.अशी घटना कुठे दिसून येत असल्यास त्याबाबत पोलिसांना कर्तव्य समजून माहिती दिल्यास अत्याचारा ग्रस्तांना मदतीचा हात  देता येईल.वाईट हेतूने केलेल्या 

स्पर्शबाबत(बॅड टच) प्रतिकार करण्याची क्षमता ठेवावी. अठरा वर्षाखालील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी दुचाकी वाहने चालवणे तसेच ट्रिपल सीट बसविणे कायद्याने गुन्हा आहे.तेव्हा पालकांनी देखील लहान वयापासूनच आपल्या पाल्यांना कायदा मोडण्याची मुभा देऊ नये.पालकांनी याची दखल घ्यावी.असे आढळल्यास गुन्हा दाखल करण्याचे प्रावधान देखील कायद्यात आहे.असे प्रतिपादन अकोला जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी केले.त्यांच्या संकल्पनेतून आयोजित महिला व बालक सुरक्षा व सुरक्षात्मक उपाययोजना याबाबत आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते.या कार्यशाळेचे आयोजन मुर्तीजापुर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने महालक्ष्मी मंगल कार्यालय येथे करण्यात आले होते. 

याप्रसंगी व्यासपीठावर दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश श्री.कुरेशी साहेब,उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार,नगरपालिकेच्या मुख्याधिकारी सुप्रिया टवलारे तसेच अकोला दामिनी पथकाच्या पोलीस निरीक्षक उज्वला देवकर, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार घुगे,ग्रामीण पोलीस स्टेशनचे थानेदार सुरेंद्र राऊत,माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरवसे यांची उपस्थिती होती.



यावेळी दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश श्री.कुरेशी साहेब यांनी देखील उपस्थित विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन करुन महत्त्वपूर्ण माहिती दिली.याप्रसंगी विविध शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच शहरातील मान्यवर, महिलावर्ग यांची देखील उपस्थिती होती.याप्रकारे तालुका आणि ग्रामीण भागात विविध स्तरावर कार्यशाळा आयोजित करून जनजागृती करण्यात येणार असल्याचे संदीप घुगे यांनी पुढे बोलताना सांगितले.यावेळी शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार घुगे यांनी देखील गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्याकरिता विविध उपाय योजनांबाबतची माहिती दिली.सूत्रसंचालन गोपाल मुकुंदे यांनी केले.तर आभार पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी यांनी केले.

आईने किडनी दिल्याने  मुलाला मिळाले जीवदान

आईने किडनी दिल्याने मुलाला मिळाले जीवदान



 अमरावती सुपर स्पेशालिस्ट रुग्णालयात यशस्वी प्रत्यारोपण

 मुर्तीजापुर : दोन्ही किडन्या निकामी झालेल्या गॅस टँकर चालक मुलास आईने  किडनी देऊन आपल्या पोटच्या गोळ्याला मृत्यूच्या दाढेतून परत आणून  मातृत्वासोबत दातृत्वाचा परिचय दिला.आई आपल्या पाल्याचे प्राण वाचवण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत धडपड करते हे या घटनेवरून दिसून आले आहे .  

        

तालुक्यातील उमरी अरब येथे राहणारे मुस्ताक बिन मुजफ्फर चाऊस (वय-३९) हे गॅस टँकर चालवुन आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मागील एक वर्षापासून किडनीच्या आजाराने ते त्रस्त झाले होते त्यांच्या आजारावर किडनी प्रत्यारोपण हाच एकमेव पर्याय होता.



त्या अनुषंगाने अमरावती येथील सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये त्यांच्या आई शकीला बी मुजफ्फर चाऊस (वय-५८) यांनी एक किडनी आपल्या मुलास घेऊन जीवदान दिले.प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया अमरावती येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ.अमोल नरोटे, विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनास नेफ्रॉलॉजिस्ट डॉ.प्रणित काकडे,डॉ. नयन काकडे ,डॉ.हितेश गुल्हाने ,युरोसर्जन डॉ.राहुल पाटोडे,डॉ. विक्रम देशमुख, डॉ. विशाल बेलवीर ,डॉ. प्रतीक चिरडे ,बधिरीकरण तज्ञ डॉ. रोहित हातगावकर, डॉ.बालकृष्ण बागवले ,डॉ.दिपाली देशमुख ,डॉ. जफर अली,डॉ.नंदिनी देशपांडे,डॉ.अंजू दामोदर,डॉ.सुनीता हिवसे आर.एम.ओ. , किडणी समन्वयक डॉ.शीतल बोंडे यांच्यासह संपूर्ण पथकाने महत्त्वपूर्ण जबाबदारीची भूमिका बजावली.


सामाजिक सेवा अधीक्षक सोनाली चौधरी यांनी संपूर्ण कागदपत्राचे पूर्तता करून महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना अंतर्गत किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया निशुल्क करण्यात आली. मुस्ताक बिन मुजफ्फर चाऊस यांची १ डिसेंबर रोजी झालेली किडनी प्रत्यारोपणाची ३३ वी शस्त्रक्रिया  सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अमरावती येथील शस्त्रक्रिया होती. सदर रुग्णालयात किडनी प्रत्यारोपणाची ३३ शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्यामुळे शासकीय रुग्णालयांमध्ये देखील मोठ्या शस्त्रक्रिया यशस्वी होत असल्याने सर्वसामान्य गोरगरिबांना दिलासा मिळत आहे.

बांधकाम कामगारांना नोंदणी शुल्क केवळ एक रुपया

बांधकाम कामगारांना नोंदणी शुल्क केवळ एक रुपया



अकोला : बांधकाम कामगारांना  अर्ज  नोंदणीसाठी वार्षिक केवळ एक रूपया शुल्‍क  आकारण्‍यात येते व  रीतसर पावतीही  देण्‍यात येते.  त्यामुळे कामगार बांधवांनी कुठल्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्‍त डॉ. रा.दे.गुल्‍हाने यांनी केले आहे.


महाराष्‍ट्र इमारत  व इतर  बांधकाम कामगार  कल्‍याणकारी  मंडळाच्‍या असंघटित  कामगारांची  नोंदणी, नूतनीकरण  व विविध  योजना  लाभ वाटपाचे  काम करताना एक रुपया वार्षिक शुल्काव्‍यतिरिक्‍त कोणतेही  अतिरिक्‍त शुल्‍क आकारले जात  नाही. नोंदणी, नूतनीकरण व विविध योजनेबाबत अडचण असल्यास कार्यालयास प्रत्यक्ष भेट द्यावी किंवा कार्यालयाचे मोबाईल क्र. 7576625585 वर संपर्क करावा.


या कामकाजासाठी कोणत्‍याही खासगी प्रतिनिधी, अथवा एजंट, दलाल  यांची नेमणूक करण्‍यात  आलेली नाही.  बांधकाम  कामगारांना  त्‍यांच्‍या योजनेनुसार   कागदपत्राची तपासणी  करण्‍याकरिता कार्यालयात खिडकीवर दिलेल्‍या तारखेस  व्यक्तिशः उपस्थित राहून मूळ कागदपत्राची  पडताळणी करणे आवश्‍यक आहे. बांधकाम कामगारांनी  इतर कोणत्‍याही  खोट्या बोलण्याला बळी न पडता नोंदणी व  नुतनीकरण  करून घ्‍यावे. तसेच अतिरिक्‍त रक्‍कम मागणी  करणा-या व्‍यक्‍तीविरूध्‍द नजिकच्‍या पोलीस ठाण्‍यामध्‍ये परस्‍पर तक्रार नोंदवावी, असे आवाहन मा. डॉ. गुल्‍हाने यांनी केले  आहे. 


कार्यालयाचे स्थानांतर..

मंडळाचे कार्यालय सहाय्यक कामगार  आयुक्‍त, अकोला कार्यालयाचे जागेत  होते. आता त्याचे स्‍थानांतर झाले असून कार्यालयाचा नवीन  पत्‍ता  मराठा सेवा  संघ कार्यालय, छत्रपती संभाजी मार्ग, मुर्तिजापूर रोड,  आर.टी.ओ. च्या जुन्या कार्यालयाजवळ, अकोला असा आहे. 


महिला अत्याचाराविरोधात पेटून उठण्याची गरज - प्रा. अंजली आंबेडकर

महिला अत्याचाराविरोधात पेटून उठण्याची गरज - प्रा. अंजली आंबेडकर



 अकोला : समाजातील विकृती वाढत असून कमी वयाच्या मुलींवर अत्याचार होतात. स्त्रियांवरील हिंसा, कौटुंबिक अत्याचार, हुंडाब‌ळी वाढले. समाजातील हे चित्र अत्यंत चिंताजनक आहे.

 याविरोधात समाजातील जागरुक झालेल्या चळवळीतील महिला तसेच सर्व घटकांनी पेटून उठण्याची गरज आहे. एकत्र येऊन लढा दिला तरच या महिलांवरील अत्याचाराला पायबंद लागण्यास मदत होईल, असे मत वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या तथा विचारवंत प्रा.अंजली आंबेडकर यांनी व्यक्त केले.

सामर्थ्य फाउंडेशनच्यावतीने आयोजित सामर्थ्य व्याख्यानमालेचे स्व. गौकर्णाबाई पांडुरंग भिरड यांच्या स्मृती प्रीत्यर्थ द्वितीय पुष्प ‘स्त्रियांची सामाजिक वाटचाल’ या विषयावर गुंफतांना त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी श्री.रा.ल.तो. विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय नानोटी, तर व्यासपिठावर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बालमुकुंद भिरड, विजया भिरड, सामर्थ्य फाउंडेशनचे अध्यक्ष प्रबोध देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 मान्यवरांचे सत्कार संस्कृती संवर्धन समितीचे अध्यक्ष डॉ. आर.बी. हेडा, डॉ. अशोक सोनोने, विजय शिंदे, ॲड. संतोष भाेरे, प्रशांत चाळीसगावकर, किरण चौक, मिलिंद देव, अनिता पळसपगार, अनुश्री उखळकर, सविता राठोड आदींनी केले.

स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील महिलांच्या अधिकाराच्या वाटवाचाल प्रा.अंजली आंबेडकर यांनी अभ्यासपूर्ण उलगडली. ‘चूल आणि मूल’ पुरते मर्यादित असलेल्या देशातील महिला स्वातंत्र्य चळ‌वळीच्या निमित्ताने प्रथम घराबाहेर पडल्या. 

नोकरी, राजकारणात आल्या. हा क्रांतिकारी आमूलाग्र बदल भारताच्या संविधानाने महिलांना दिला. त्याचे श्रेय घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व समितीला आहे. जाती व्यवस्था मोडायची असेल तर आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, हा विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडला. 

आजच्या काळात महिलांना संपत्तीत मिळालेला समानता, मनाने नको ते लग्न मोडण्याचा आणि एका विशिष्ट प्रौढ वयात लग्न करण्याचा अधिकार त्याकाळी संविधान निर्मितीनंतर घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना समितीपुढे हिंदू कोड बिलामध्ये मांडलेला होता. त्यामुळेच ते फेटाळले गेले होते, हे सर्व स्त्रियांनी समजून घेणे गरजेचे आहे, असे प्रा.आंबेडकर म्हणाल्या.

१९७५ नंतर देशात खऱ्या अर्थाने स्त्री मुक्ती चळवळीला गती मिळाली. हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला वर्ष जाहीर झाले होते. त्याचवर्षी इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली. सर्व सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी होती. महिलांच्या कार्यक्रमावर महिला पंतप्रधानाने बंदी लावली तर चहूबाजूने टिकेची झोड उठणार, हे लक्षात घेऊन इंदिरा गांधींनी महिला सक्षमीकरणाच्या कार्यक्रमावरीस बंदी उठवली. विरोधी पक्षांनीही महिलांच्या माध्यमातून कार्यक्रम घेऊन त्याचा फायदा घेतला. 


त्यामुळे स्त्री मुक्ती चळवळीला नवी दिशा मिळाली, असे देखील त्यांनी सांगितले. प्रास्ताविक प्रबोध देशपांडे यांनी, तर सूत्रसंचालन डॉ. स्वाती दामोदरे यांनी केले. आभार ॲड. धनश्री दामोदरे यांनी मानले.

१८ किलो गांजा जप्त; मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांची कारवाई

१८ किलो गांजा जप्त; मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांची कारवाई

मूर्तिजापूर: ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अनभोरा येथे ग्रामीण पोलिसांनी १ लाख ८० हजार रुपयांचा जप्त करुन आरोपी लक्ष्मण उर्फ सोनू बाबाराव मोहिते यास अटक केली.



मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून ४ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास अनभोरा येथील.

लक्ष्मण उर्फ सोनू बाबाराव मोहिते (२३) याच्या घरी छापा टाकून त्याच्या कडून विक्रीसाठी ठेवण्यात आलेला १ लाख ८० हजार १२० रुपये किमतीचा १८ किलो १२ ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आला या प्रकरणी आरोपी लक्ष्मण उर्फ सोनू बाबाराव मोहिते यास अटक करुन त्याच्या विरूद्ध अपराध क्रमांक ४०१ / २३ कलम २० ब एन डी पी एस अक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा


पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सुरेंद्र राऊत, पोलिस उपनिरीक्षक सुनील नवलाखे, विजय मानकर, गोलंदास लांजेवार, अनिल टोपकर, संजय खंडारे, मनिष मालठाणे, शंकर खेडकर, गणेश ठाकरे घनश्याम सलामे, इरफान अली, महिला शिपाई वर्षा धारपवार यांनी केली.