मुरुम व उमरगा येथील दोन्ही संवेदनशिल खुनाचे गुन्हयाचा उलघडा दोन आरोपींना गजाआड



  • उस्मानाबाद पोलीस दलाची कामगिरी

इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- पोलीस ठाणे मुरुम व उमरगा येथे दाखल खुनाचे दोन्ही गुन्हयांचा उलघडा झाला असुन सदर गुन्हयातील मयताची ओळख पटवुन गुन्हयातील आरोपींना उस्मानाबाद पोलीस दलाने गजाआड केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि,दि.11/9/018 रोजी मौजे कवठा येथे अज्ञात मुलगी वय अंदाचे तीन ते चार वर्ष हीस कोणीतरी अज्ञात व्यक्तीनी अज्ञात कारणासाठी तीचा गळा कशाने तरी आवळुन तीस जिवे ठार मारुन तीचा खुन करुन तीचे प्रेत हे पुरावे नष्ट करण्याचे उद्देशाने मौजे कवठा शिवारातील शंकर नागप्पा झांबरे यांच्या शेतालगत उमरगा ते लातुर जाणारे राज्य मार्ग क्रं.164 चे पश्चिमेस रोडचे दगडाचे पिंचीगच्या पायथ्याखाली आणुन टाकलेले मिळुन आलेने पो.नि.गुंडीले यांच्या फिर्यादीवरुन पोलीस ठाणे उमरगा येथे गु.र.नं.303/2018 कलम 302,
201,भा.द.वि.प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्याच प्रमाणे दि.12/9/018 रोजी पोलीस ठाणे मुरुम हद्दीत एक अज्ञात मयत स्त्री वय अंदाजे 30 ते 35 वर्ष हिस कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अज्ञात ठीकाणी तिचे डोक्यात कशाने तरी मारुन तीचे छातीवर,पाठीवर व गुप्तअंगाजवळ मारहाण करुन तसेच तीस चटके देवुन तीला ठार मारुन तीचा खुन करुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तीचे प्रेत हे आष्टामोड ते येणेगुर एन एच 65 हायवे रोडचे उत्तर बाजुस आणुन टाकलेले मिळुन आलेने पो.उपनिरीक्षक ज्ञानदेव सानप यांच्या फिर्यादीवरुन मुरुम पोलीस ठाण्यात गु.र.नं.173/
2018 कलम 302,201भा.द.वि.प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 सदर दोन्ही गुन्हे घडलेपासुन गुन्हयातील मयताची व आरोपीचा शोध पोलीस घेत होते.परंतु त्यांना यश येत नव्हते.गुन्हयातील अनोळखी मयताची ओळख पटत नसल्याने तपासात अडचणी येत होत्या.परंतु पोलीस ठाणे मुरुमचे सहाय्यक पो.नि.मुस्तफा शेख व स्थागुशाचे पो.नि.डी.एम.शेख व त्यांच्या पथकानी अहोरात्र परिश्रम घेवुन सदर गुन्हयातील मयताजवळ सापडलेल्या प्लाँस्टीकच्या बँगवरील नावावरुन दि.18/9/018 रोजी रात्री बार्शी तसेच मौजे आळसुंदा येथे जावुन मयत महिलेच्या घराचा व नातेवाईकांचा शोध घेतला.तेथे सदर गुन्हयातील मयताचे छायाचित्र नातेवाईक व शेजारच्या लोकांना दाखवताच त्यांना ओळखुन मयत स्त्रीचे नाव सीमा रवि ओहळ (वय 33) व मयत मुलीचे नाव आरोही पिता रवि ओहळ (वय 3 ते 4) असे असल्याचे निष्पन्न झाले.मयतांची ओळख पटली परंतु गुन्हयातील आरोपीचा शोध लागत नव्हता.सदरील गुन्हा गणेश नगर येथील एक इसम व एक महिला यांनी केला असल्याची माहीती मिळाल्याने दि.20/9/018 रोजी मौजे उमरगा येथुन आरोपी सपना ऊर्फ शंकुतला शिवाजी साळुंके (वय58) व अमर ऊर्फ बच्चन ऊर्फ बच्चु शिवाजी साळुंके (वय 28) दोघे रा.गणेश नगर आय टी आय कॉलेजच्या बाजुला लातुर रोड उमरगा ता.उमरगा जि.उस्मानाबाद यांना अटक केली असुन त्यांनी सदर दोन्ही गुन्हे केले असल्याचे कबुली दिली आहे.
सदर अंती संवेदनशिल खुनाचे गुन्हयाचा तपास हा पोलीस अधिक्षक आर.राजा(उस्मानाबाद),अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती स्वाती भोर,उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस (उमरगा),यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पो.नि.डी.एम.शेख,पो.
उपनिरीक्षक पांडुरंग माने,सहाय्यक पो.नि.मुस्तफा शेख (मुरुम),पो.उपनिरीक्षक श्रीमती ढाकणे,पो.ना.
खलील शेख,पो.ना.सुर्यवंशी,पो.कॉ.घारगे व अवसर स्थागुशाचे अश्विनकुमार जाधव,शेख फरीद सय्यद,
किशोर रोकडे,भागवत झोंबाडे,हुसेन सय्यद,विजय घुगे,कावरे सायबर सेलचे मोरे व कदम यांनी केला.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post