![]() |
नीलेश सूखसोहळे
मुर्तिजापूर :- युवक बिरादरी (भारत) यांच्या वतीने स्पर्धात्मक उपक्रमाचा देण्यात येणारा युवा भूषण पुरस्कार मुर्तिजापूर येथील गणेश देशमुख यांना देऊन सन्मानित करण्यात आले आहे,युवक बिरादरी (भारत) यांच्या वतिने नुकतेच स्पर्धात्मक उपक्रम राबवून युवकांमधील सुप्त गुणांना वाव मिळावा या हेतूने निवड केलेल्या युवकांना युवा भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येते,
गणेश देशमुख यांना यंदाचा युवा भूषण पुरस्कार अमरावती येथील भारतीय महाविद्यालय येथे आयोजित सोहळ्यात प्रदान करण्यात आला,पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी भारतीय विद्यामंदिराचे अध्यक्ष रमेश बिजवे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून युवक बिरादरी अमरावतीचे संचालक प्रा.विजय लुंगे,प्रा.डॉ.अनुराधा वैद्य,युवक बिरादरीचे शहराध्यक्ष डॉ.विनय तिडके, विदर्भ समन्वयक गौरव इंगळे, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती,युवक बिरादरी (भारत) चे अध्यक्ष अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम चालतो,विविध क्षेत्रात कार्यरत असलेले व विधी क्षेत्राचे शिक्षण घेत असलेले मुर्तिजापूर येथील गणेश दिनेशराव देशमुख यांना युवा भूषण पुरस्कार व रोख रक्कम सह शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले,त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे,कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विदर्भ समन्वयक गौरव इंगळे, निखिल मानकर,सचिव सूरज जामठे,प्रफुल्ल घवळे,शुभम देशमुख,संयोजक वैष्णवी निचित,मधूलिका देशमुख,सह आदींचे सहकार्य लाभले .