मुर्तीजापुर :- यल्लम्मा उर्फ रेणुका माता यात्रा महोत्सवानिमित्त आज दिनांक २४ रोजी देवीच्या पादुका पालखीची भव्य मिरवणूक शहरातून काढण्यात आली. फुले आणि भंडारा उधळत देवाच्या नावाचा जयघोष करीत भक्तीभावाने हर्षोल्हासात मिरवणूक पार पडली. या मिरवणुकीला सकाळी अकरा वाजता चिखली रस्त्यावरील देवीच्या मंदिरापासून प्रारंभ झाला. शहरातील विविध मार्गावरून देवीची मिरवणूक काढण्यात आली. या दरम्यान हजारो भाविकांचा सहभाग होता. शहरवासीयांनी चौकाचौकात फटाके फोडून व पुष्पवृष्टी करून मिरवणुकीचे स्वागत केले. त्याचप्रमाणे हनुमान मंदिराजवळील युवकांनी भाविकांसाठी नाश्ता तसेच चहा पाण्याची व्यवस्था केली होती. तर रेल्वे स्टेशन समोर देखील युवकांद्वारा देवीच्या यात्रेत सहभागी भाविक-भक्तांना नाश्त्यासाठी पोहे केले होते.जयस्तंभ चौकातील खंडोबा मंदिराजवळ अहमदाबाद येथील विनायकराव यदवर आणि मुर्तीजापूर येथील रमेश कोळवले यांच्यातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.या महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. सायंकाळी साडेचार वाजता मिरवणूकीची मंदिरावर सांगता झाली. शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार आव्हाळे यांनी पोलिस बंदोबस्त चोख ठेवला होता. मूर्तिजापूर येथील चिखली रस्त्यावर असलेल्या यल्लमा उर्फ रेणुका माता मंदिरात दरवर्षीप्रमाणे दिनांक २३/१२/२०१९ पासून यात्रा महोत्सव हर्षोउल्हासात साजरा झाला. यात्रा महोत्सवादरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. दोन दिवस चालणारा हा यात्रा महोत्सव मोठ्या आनंदाने आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. यात्रा महोत्सव याकरिता महाराष्ट्रातील दूरदूरच्या जिल्ह्यातील भाविक तसेच महाराष्ट्राबाहेरील बाहेरील राज्यातून देखील भाविकांनी गर्दी केली होती. दिनांक 23 रोजी सकाळी सात वाजता देवीचा अभिषेक त्यानंतर साडेनऊ ते दहा वाजता महाआरती,साडे दहा ते साडे अकरा वाजता बाईक रॅली, दुपारी एक ते चार दरम्यान गंधाचा कार्यक्रम आणि सायंकाळी आठ ते दहा दरम्यान भजन संध्या असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यात्रा महोत्सव यशस्वी करण्याकरता यात्रा महोत्सव समिती व युवकांनी परीश्रम घेतले.महाप्रसादाचे आयोजन दि.२७ रोजी देवीच्या मंदिरात ११ ते २ वाजेपर्यंत करण्यात आले आहे.
यल्लमा उर्फ रेणुका देवी पादुका पालखीची भव्य मिरवणुक - हजारो भाविकांचा सहभाग.