मुर्तीजापुर :- आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवार विजयी होण्याच्या दृष्टीने बूथ समिती बांधणीचा आढावा घेण्यासाठी न्यू मोहन हॉटेलच्या सभागृहात झालेल्या बैठकीत विशाल शिरभाते यांची नियुक्ती करण्यात आली
या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते व जिल्ह्याचे निरीक्षक प्रवीण कुंटे, जिल्हाध्यक्ष संग्राम भैय्या गावंडे, प्रदेश प्रवक्ते डॉक्टर आशाताई मिरगे ,माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत दादा पाटील ,जिल्हा उपाध्यक्ष इब्राहिम कासम घाणिवाला विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अविनाश चव्हाण, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष निजामभाई या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी कॉंग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी विशाल शिरभाते यांना नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली
यावेळी तालुकाध्यक्ष जगदीश मारोटकर , मतदार संघ अध्यक्ष अध्यक्ष सागर कोरडे ,शहर अध्यक्ष राम कोरडे ,तालुका महिला आघाडी अध्यक्षा रजनी पवार ,शहर महिला अध्यक्ष सुनंदा नवघरे ,दयाराम घोडे ,रवी राठी, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष एडवोकेट महेश सरप ,सामाजिक न्याय अध्यक्ष सुरळकर ,श्रीधर कांबे ,तालुका युवक कांग्रेस अध्यक्ष अब्दुल जावेद , शहर युवक अध्यक्ष अतुल गावंडे ,वैभव कानकिरड, निखिल ठाकरे ,सचिन गावंडे सह कार्यकर्ते उपस्थित होते