इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- सी एम चषक क्रिडा स्पर्धांच्या उमरगा,लोहारा विधानसभा क्षेत्रातील क्रिडा स्पर्धांचे उदघाटन
लोहारा शहरातील हायस्कुल शाळेच्या प्रांगणात
दि.19 डिसेंबर रोजी जि.प.चे अर्थ व बांधकाम सभापती अभय भैय्या चालुक्य यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख म्हणुन जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष कैलास शिंदे,भाजपा तालुका अध्यक्ष माधव पवार (उमरगा), भाजपा तालुका अध्यक्ष विक्रांत संगशेट्टी (लोहारा), लोकसभा समन्वयक श्रीकांत गोसावी, नगरसेवक अरुण इगवे, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस नेताजी शिंदे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष बालाजी चव्हाण, विद्यार्थी आघाडी तालुका अध्यक्ष बाबा सुंबेकर, भाजपा जिल्हा चिटणीस सुरेश वाघ, पं.स. दसदस्य ज्ञानेश्वर परसे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राजेंद्र पाटील, विस्तारक सिध्देश्वर माने, भाजप मिडिया तालुका अध्यक्ष इकबाल मुल्ला, किसान आघाडी तालुका अध्यक्ष सुनिल सुर्यवंशी, ओबीसी तालुका अध्यक्ष दगडु तिगाडे, भाजपा शहराध्यक्ष अशोक तिगाडे, प्रविण चव्हाण,अदि उपस्थित होते.
या स्पर्धाअंतर्गत ग्रामीण भागातील खेळाडूंना राज्यस्तरीय व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. कब्बडी,खो-खो,धावणे,क्रिकेट,कुस्ती,रांगोळी,
नृत्य, अशा विविध क्रीड़ाप्रकारांसह कलागुणांना प्रोत्साहित करने असा या स्पर्धांचा उद्देश आहे.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बालाजी कदम यांनी केले तर आभार सिध्देश्वर माने यांनी मानले. या कार्यक्रमास प्रमोद पोतदार,प्रदिप सांगवे, अभिषेक पवार, विजय महानुर, दिनेश बायस, सिध्देश्वर बिडवे, बालाजी चव्हाण, यांच्यासहच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.