इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- संगणक क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य केल्याबद्द्ल उमरगा शहारातील 'मायक्रोकॉम' संस्थेस महाराष्ट्र ज्ञान महामंडळ ( पुणे) यांच्या वतीने उत्कृष्ठ संगणक केंद्राचा विभागीय पुरस्कार देवुन गौरव करण्यात आला.
हा पुरस्कार सोहळा औरंगाबाद संपन्न झाला.
या विभागीय कार्यक्रमात महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे कार्यकारी संचालक विवेक सावंत यांच्या हस्ते संस्थेचे अध्यक्ष प्रा. युसुफ मुल्ला यांना पुरस्कार देवुन गौरविण्यात आले. यावेळी विभागीय समन्वयक बालकिशन बलदवा, जिल्हा समन्वयक धनंजय जेवळीकर, अतुल पातोडी, हेमंत वंदेकर, आदींची उपस्थिती होती. 'मायक्रोकॉम' संस्थेने या क्षेत्रात गेल्या 20 वर्षापासुन उत्कृष्ण कार्य करून शेकडो विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करुन दिले आहे. या संस्थेच्या उत्कृष्ठ कार्याबद्दल यापुर्वाही एमसीईडी औरंगाबादचा विभागीय पुरस्कार, पीप्युल्स ऑलंपीकचा राष्ट्रीय पुरस्कार, मधुकर धस स्मृती गौरव पुरस्कार व येणेगुर फेस्टिव्हलचा राज्यस्तरीय पुरस्कार देवून गौरव करण्यात आले आहे. या यशाबद्दल प्रा. मुल्ला यांचे सर्व स्थरातुन अभिनंदन करण्यात येत आहे.