- गुरूच्या शब्दाला व्यावसायीकानी दिला मानाचा मुजरा
यवतमाळ : महसुल विभागाच्या वतीने आझाद मैदानाला कुलूप लावुन सिल केल्याने आझाद मैदान चौपाटी येथे बसुन उदर्निरवाह करणार्याच्या संसार उघड्यावर आले होते त्यामुळे हातगाडी संघटना तसेच ईतर छोट्या व्यवासयींकानी आमरण उपोषणाचा मार्ग स्विकारला होता गेल्या सात दिवसापासुन उपोषन सुरू असताना एकाही शासकीय अधीकार्याने दखल घेतली नाही .मात्र अध्यामीक गुरू प्रेमासाई महारांजानी दोन दा उपोषनकर्त्याची भेट घेवुन आपन नक्कीच यातुन मार्ग काढु असा शब्द दिला त्यामुळे आज अध्यामिक गुरू प्रेमासाईच्या शब्दाला मान देत उपोषन करत्यानी गुरूच्या हाताने रस ग्रहण करून उपोषन सोडले. आझाद मैदानात व्यावसायिक अनेक वर्षांपासून छोटा-मोठा व्यवसाय करून कुटंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. मात्र एसडीओंच्या आदेशाने अचानक या मैदानाला कुलूप बंद करण्यात आले.
त्यामुळे चौपाटीवर व्यवसाय करणाऱ्या शेकडो व्यावसायिकांचा रोजगार हिरावल्या गेला. या अन्यायाविरोधात हातगाडी व्यवसायीक संगठनेच्या नेतृत्वात 11 सप्टेंबरपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. या सहा दिवसात 18 आंदोलनकर्त्यांन पैकी 18 ही आंदोलनकर्त्यांची प्रकृति खालावली होती.रविवार 16 सप्टेंबर रोजी दुपारी 3.00 वाजता सरकारी दवाखाण्याचे डाक्टर उपोषण मंडपातील आंदोलनकर्त्यांची तपासणी करीता आले होते. या वेळी 18 मधुन दोन आंदोलकर्त्यांचे शुगर लो झाली व अन्य आंदोलनकर्त्यांचे बीपी लो झाल्याचे आढळुण आले आहे.
अत्यवस्थ असलेल्या दोन आंदोलनकर्त्यांनमध्ये ज्ञानेश्वर ठाकरे व राजू नामदेवराव मादनकर यांची सरकारी दवाखाण्याच्या डाक्टर यांनी तपासणी केल्यावर, दोन्ही आंदोलनकर्त्यांची बीपी व शुगर लो झाल्यामुळे यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यास सांगीतले. हातगाडी संगठना यवतमाळ चे अध्यक्ष मनीष पा. लोळगे यांनी एसडीओशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र यामध्ये एसडीओनी कोणतीही दखल घेतली नाही हे विषेश मात्र आज आध्यमीक गुरू प्रेमासाई यांनी यामध्ये तोडगा काढत हे उपोषन सोडविले त्यामुळे संघटनेच्या वतीने त्यांचे आभार मानले यावेळी
प्रभुदास दडे, राजेश प्रजापति, अजय भुजाडे, अविनाश नंदनवार, अरविंद रंगारी, अतुल भुराणे, सुरज सुटे, दिलीप करोडे, विष्णु चौधरी, सुरज चौधरी, हरीश निखाडे, गौतम मेश्राम, रामचंद्र रावत, शुभम पावडे, हेमंत माने, विक्रम इंगळे, विजय पलटनकर, ऐतिशामोद्दीन काझी, विजय सोनकर, राहुल भोयर, सागर बांगरे, आशीष बावने, दिगांबर पखाले, कैलास मोंग्या, ज्ञानेश्वर ठाकरे, राजू मादनकर, प्रभाकर डफाळ, भिमराव पसाडे उपोषण मंडपात उपस्थित होते.