भुषण,महाजन
रावेर प्रतिनिधी :- रावेर, तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट आहे. कुठलेही वैद्यकीय शिक्षणातील पदवी घेतलेली नसताना रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. प्रशासकीय तपासणी केवळ नावालाच असून, बोगस डॉक्टर्सवर कारवाईची गरज आहे.
रावेर शहरासह तालुक्याच्या अजदा गावात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट आहे. कुठलेही वैद्यकीय शिक्षणातील पदवी घेतलेली नसताना रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. प्रशासकीय तपासणी केवळ नावालाच असून, बोगस डॉक्टर्सवर कारवाईची गरज आहे. रावेर
शहरासह तालुक्यातील अजदा ,गावांमधे आठवड्यातील.काही दिवस बोगस छोलछाप. डॉक्टरांचा ठरलेला असतो. छोट्याशा खोलीत दवाखाना थाटून शेकडो रुग्णांची बोगस डॉक्टर्स तपासणी करून ते पैसे उकळत आहेत. यावर प्रशासनाचा अंकुश नसल्याने असे प्रकार सर्रास आहेत. तालुक्याच्या अजदा,गावात हा बोगस डॉक्टर काम करत आहेत. गावांना अवैध वैद्यकीय व्यवसाय चालत असल्याचे खुद्द गावातील प्रतिष्ठितांनी सांगितले आहे.
शहरातील एखाद्या खासगी दवाखान्यात काही दिवस कंपाउंडर म्हणून काम करायचे. त्यानंतर स्वत:चा दवाखाना थाटायचा असा प्रकार सुरू आहे. मात्र, औषधी बरोबर दिली जातात का ? औषधीचा डोस योग्य आहे का ? त्याचा रुग्णाच्या शरीरावर विपरीत परिणाम तर होणार नाही ? याकडे कुणीच लक्ष देत नसल्याने रुग्णांच्या जिवाशी खेळ खेळला जात आहे.
स्टिरोइड ड्रग्सचा वापर
रुग्णास त्वरित आराम मिळावा म्हणून हे डॉक्टर सर्रास स्टिरोइड ड्रग्सचा वापर करीत आहेत. जास्त प्रमाणात (हायडोस) औषधीचा वापर करीत असल्याने त्यांच्या शारीरिक आरोग्यावर विपरीत परिणामही होतो
कोणी या बोगस,डाँक्टरान वर कारवाई करत नाही त्या मुळे अशा बोगस डॉक्टरांचे फावत आहे. यासाठी आरोग्य विभागाने यांचा शोध घेणे गरजेचे आहे. अशी मागणी होत आहे.