पाण्यासाठी काँग्रेसचे आंदोलन



यवतमाळ : निळोणा व चापडोह फिल्टर प्लाँटवरून पाणी शुध्द करून नळाद्वारे त्वरीत पाणी पुरवण्याबाबत तसेच पाणी टंचाई दरम्यान मागील सहा महिन्याचे पाणी पुरवठ्याचे बील माफ करण्याकरीता शहर काँग्रेस कमिटी तथा शहर महिला काँग्रेस कमेटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरूवार, दि. १४ जून रोजी सकाळी ११ वाजता एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. 

जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात निळोना, चापडोह धरणामध्ये जलसाठा उपलब्ध होता. तेव्हढ्या जलसाठ्यावर यवतमाळकरांना पाणी पुरवठा करता येत होता. मात्र, राजकीय दबावामुळे जनतेला वेठीस धरण्यात आल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आला. या घटनेचा निषेध आणि यवतमाळकरांना लवकरात लवकर निळोना, चापडोह धरणातून पाणी पुरवठा चालू करून घेण्यासाठी उपोषण करण्यात आले. . या उपोषणात काँग्रेसच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांसह नगर पालिका सदस्यांनी हजेरी लावली.

यावेळी बाळासाहेब मांगुळकर, बाबाबासाहेब गाडे, काँग्रेस शहराध्यक्ष चंद्रशेखर चौधरी, महिला शहराध्यक्ष उषा दिवटे, युथ जिल्हा काँग्रेसचे रितेश भरूट, नगरसेवक जावेद अन्सारी, वैशाली सवाई, अनिल देशमुख, छोटू पावडे, सलीम शहा, शहजाद शहा, दर्शना इंगोले, शब्बीर खान, मोहसीन खान, पल्लवी रामटेके, नसीमा बानो, दिनेश गोगरकर, अजय किन्हीकर, गोकुल कोकेवार, अरूण ठाकुर, प्राजक्ता तेलगोटे,  दत्ता हाडके, उमेश इंगळे, घनशाम अत्रे, डॉ.बीपीन चौधरी, कृष्णा पुसनाके, विक्की राउत, बाळु काळे, लखन शेंद्रे, राजु बोडखे, शैलेश सिकची, संदीप कोचर, अरूण बोरकर, संतोष सहारे, सुधीर उके, सागर माहुरकर, अरविंद चव्हाण, मंदा चव्हाण, मंदा लभाणे, अरूण राउत, रितेश भरूट, रविंद्र निशाणे, मुकेश देशभ्रतार,डॉ.अनिकेत तेलगोटे आदी सहभागी झाले होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post