इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी:- ग्रामीण रुग्णालय स्पर्श सास्तूर सारख्या दर्जेदार आरोग्य सेवेच्या ध्यास घेतलेल्या कार्यकर्त्यांमुळे व आपल्या आरोय सेवेच्या कार्याप्रती ध्येय वेडेपणा मुळेच गेली 22 वर्ष हे रुग्णालय सातत्यपूर्ण आरोग्य सेवा देऊ शकले आहे.आरोग्य सेवेतील त्यांची हि भरारी पाहून त्यांचे कौतुक करण्यास शब्द अपुरे पडतात असे प्रतिपादन उस्मानाबादचे पालकमंत्री अर्णून खोतकर पालकमंत्री यांनी केले.
जागतिक आरोग्य दिना निमित्त लोहारा तालुक्यातील सास्तूर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयच्या प्रांगणात दि.7 एफ्रिल रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रमुख म्हणुन खा.प्रा.रविंद्र गायकवाड,आ.ज्ञानराज चौगुले,जिल्हा अधिकारी राधाकृष्ण गमे,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एकनाथ माले,जिल्हा आरोग्य अधिकारी हणमंत वडगावे,उपविभागीय अधिकारी निलेश श्रृंगी,उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शिनगुलवार,गटविकास अधिकारी डॉ.क्रांती बोराटे,जितेंद्र शिंदे,शिवसेना युवा नेते किरण गायकवाड,माजी जि.प.सदस्य राहुल पाटील,सरपंच यशलंत कासार,उपसरपंच पृथ्वीराज पाटील, डॉ.सुनिल मंडले,डॉ.धप्पाधुळे,शिवसेना तालुका प्रमुख मोहन पणुरे,अदि उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री अर्जुन खोतकर पुढे बोलताना म्हणाले कि,स्पर्श सारखी आरोग्य सेवा इतर रुग्नाल्यानीही दिल्यास आरोग्य मान उंचावण्यास निश्चित मदत होईत.या रुग्णालयाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देताना ते म्हणले कि या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून ग्रामीण रुग्णालय स्पर्श सास्तुरला इथून पुढे सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. त्याच्या अडी अडचणी मध्ये संपूर्ण मदत केली जाईल,असे सांगीतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामीण रुग्णालय सास्तूर स्पर्श चे प्रकल्प अधिकारी श्री आर. बी .जोशी यांनी केले त्यांनी आपल्या प्रास्तविकात ग्रामीण रुग्णालय स्पर्शच्या आज पर्यंतच्या वाटचालीची माहिती दिली व टीमवर्क,इच्छाशक्ती रुग्णाप्रती कार्मचार्यांची
तळमळीची भावना व सकारात्मक दृष्टीकोनामुळेच हे साध्य झाले असे ते म्हणाले.या वेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एकनाथ माले म्हणाले कि,शेवटच्या श्वासा पर्यंत निरोगी राहण्याची गुरुकिल्ली त्यांनी सांगितली चांगला सकस आहार, योगासने प्राणायम,व्यायाम विश्रांती व तणावरहित जीवनाने मनुष्य संपूर्ण आयुष्य निरोगी जगू शकतो तसेच वैयक्तिक स्वच्छता,परीसर स्वच्छता ठेवल्याने अनेक आजारांना प्रतिबंध करता येतो.आरोग्य सेवेसाठी शासनाच्या अनेक चांगल्या योजना उपलब्ध आहेत.अत्यंत दुर्धर आजार देखील या योजानाद्वारे संपूर्ण मोफत करता येतात गरीब व गरजू जनतेने अशा शासकीय योजनांचा अवश्य लाभ घ्यावा.
या शिबीरात 322 व्यक्तींची मधुमेह व रक्तदाबाची तपासणी करण्यात आली.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभार स्पर्श ग्रामिण रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी डॉ.आर.बी.जोशी यांनी मानले.या कार्यक्रमास ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.