- 31 गौवश्यांना जीवनदान तर 1 दगावले
- ग्रामीण पोलिसांची दुसरी मोठी कारवाई
विलास नस्ले
मुर्तिजापूर ( प्रतिनिधी )मुर्तिजापूर-- दर्यापूर मार्गावर अनेक दिवसापासुन अवैध गौवंश वाहतुक सुरू असल्याबाबतची कुणकुण मुर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन चे ठाणेदार नितीन पाटील यांना लागली होती. आज दिनाक 13/6/2018 ला दुपारी एक वाजताच्या सुमारास मिळालेल्या गुप्त माहीती वरून सिरसो फाठ्या जवळ पोलीस हेड कॉस्टेबल विनोद कुम्हरे ., पो. काॅ. अनिल राठोड
,पो काॅ. प्रशांत सरोदे यांनी ठाणेदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा लावला. दुपारी एक वाजताच्या सुमाराट्रक दर्यापूर कडून येणारा 10 चाक्की ट्रक क्रमांक mp -o9 -- HG 4262 ला थांबविण्याचा प्रयत्न केला असता ट्रक चालकाने ट्रक भरधाव पळवुन नेला .पोलीसानी दुचाकी वरून एक कीलोमीटर सीने स्टाईल पाठलाग करून ट्रक थांबवीला सदर ट्रक वरून अर्धा खाली दिसत असल्याने टॅक चालकाने पोलीसाना उडवा उडवीची उत्तरे देऊन ट्रक रिकामा असल्याचे सांगीतले .परंतु पोलीसानी ट्रक ताब्यात घेऊन पाहणी केली असता झाकलेल्या ताडपत्री खाली अत्यंत निर्दयीपणे पाय बांधुन एकमेकाच्या आंगावर कोंबुन 32 गौवंश दिसुन आले. त्यांनतर संदर ट्रक ग्रामीण पोलीस स्टेशनला आणुन आगोवश गोरक्षणात पोहचविण्यात आले . तेथे 32 पैकी एका गोवशांच्या मृत्यु झाल्याचे दिसून आले. या प्रकरणी आरोपी चालक व वाहक यांच्या विरूद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 196० कलम 5 अ.9अ .9ब . व प्राण्याना निर्दयतेने वागणुक आधीनियक 11 ल आणी कलम 429 भादवी नुसार गून्हा दाखल करण्यात आला असुन पूढील तपास ग्रा पो स्टेशन मुर्तिजापूर चे ठाणेदार नितीन पाटील करीत आहेत.(यापूर्वी दि.5-10-2017 रोजी तिन आयशर ट्रक मधून 25 गोवशांना वाहतूक करताना पकडून गोरक्षणात देण्यात आले होते. )