जैन राजनैतिक चेतना मंच विदर्भाचे विदर्भ अधिवेशन 17 जून रोजी

यवतमाळ  :- संपूर्ण विदर्भात नव्यानेच स्थापित झालेले जैन राजनैतिक चेतना मंच विदर्भाचे विदर्भ अधिवेशन रविवार, 17 जून 2018 रोजी रजवाडा पॅलेस सुभाष रोड, गांधी सागर, नागपूर येथे आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात उद्घाटन समारोहात प्रमुख अतिथी म्हणून निर्मलजी सेठी (राष्ट्रीय अध्यक्ष जैन राजनैतिक चेतना मंच, दिल्ली), महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेस कमेटी अध्यक्षा श्रीमती चारुलता टोकस, झाशीची भूतपूर्व केंद्रीय मंत्री प्रदीप जैन आदीत्यजी, महातिर्थ रक्षा कमेटी नागपूर संतोषजी पेंढारी, दिगंबर जैन महासमिती राष्ट्रीय अध्यक्ष मनीन्दजी जैन, राष्ट्रीय अध्यक्ष पुलक जैन चेतना मंचसह संपूर्ण देशातील जैन समाजातील गणमान्य माजी खासदार, आमदार, विविध पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
याप्रसंगी संपूर्ण विदर्भातील सर्व शाखेच्या पदाधिकार्‍यांचा पदग्रहण समारोह आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी जैन राजनैतिक चेतना मंचाची स्थापना या संदर्भात राष्ट्रीय अध्यक्ष संबोधन करतील. तर द्वितीय सत्रामध्ये दुपारी 2 वाजता प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय परिवहन मंत्री नितीनजी गडकरी, महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, नागपूर महानगर पालिकेचे मेयर श्रीमती नंदा जिचकार, पूर्व सांसद राज्यभा अजयजी संचेती हे आवर्जून उपस्थित राहणार आहे.
या संस्थेचे परम संरक्षक म्हणून माजी खासदार विजयबाबू दर्डा, अजयजी संचेती हे आहेत. प्रारंभी परमपूज्य डॉ.मुनीश्री 1008 प्रणाम सागरजी महाराज यांचे 8.30 वाजता रजवाडा पॅलेस येथे ढोलताशाच्या गजरात आगमन व अधिवेशनाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात येईल. याप्रसंगी अहिंसा क्रांती स्मरणिकेचे विमोचन करण्यात येईल. प.पू. मुनीश्री 1008 डॉ.प्रणाम सागरजी महाराजांचे प्रवचन होईल. तेव्हा विदर्भातील जैन राजनैतिक चेतना मंचचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विदर्भ जैन राजनैतिक चेतना मंचच्या अध्यक्षा डॉ.रिचा जैन, महामंत्री चंद्रनाथ भागवतकर, रोहितभाई शहा, विदर्भ उपाध्यक्ष डॉ.रमेश खिवसरा, जिल्हाध्यक्ष रवींद्र बोरा, उपाध्यक्ष विजयकुमार बुंदेला, सचिव राजेश लोढा, कोषाध्यक्ष सुनील भरुट यांनी केले आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post