मुर्तिजापुर :- आज दिनांक 21/7/2019 रविवार रोजी शाखा क्रमांक 12 नाका नंबर 7 सिरसो,मूर्तिजापूर येथे महाकाल सेनाचे मोठ्या उत्साहात शाखेचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी महाकाल सेना संस्थापक/अध्यक्ष लखनभैया मिलांदे संघटन उपाध्यक्ष हिराभैय्या दुबे सचिव पराग भगत शहरअध्यक्ष आशिषदादा साबळे तालुकाध्यक्ष प्रतिक जाधव उपतालुका अध्यक्ष प्रतिक मुळे उपशहाराध्यक्ष कुणाल जयस्वाल महाकाल सेना संघटना सदस्य कुणाल सुतवणे महेश सायगन आकाश सायगन उमेश तिवारी आणि सर्व महाकाल सेना शाखाप्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. महाकाल सेना संस्थापक / अध्यक्ष लखनभैया मिलांदे व समस्त महाकाल सेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या साक्षीने शाखा क्रमांक 12 नाका नंबर 7 येथील शाखाअध्यक्ष हर्षल ठोकळ उपशाखाध्यक्ष आकाश इंदुरकर सचिव क्षितिज खरबडकर व समस्त सदस्यांनी पदग्रहण केले.
शाखा उद्घाटनाच्या वेळेस लखन भैया मिलांदे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या व महाकाल सेना चे कार्य व महत्त्व सर्वांना सांगितले शहराध्यक्ष आशिष साबळे यांनी सर्व महाकाल सेनाच्या कार्यकर्त्यांना सामाजिक काम करण्यासाठी प्रोत्साहित केले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन अतुल इंगोले पाटील यांनी केले.
