औरंगाबाद : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन तर्फे निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी
अर्ज वितरित करणे तसेच जमा करणे संबंधी कार्यक्रम घोषित करण्यात आले आहे.
तरी अर्ज मा.प्रदेश अध्यक्ष यांचे कार्यालय औरंगाबाद तसेच मा.सर्व विभागीय अध्यक्ष व सर्व जिल्हा अध्यक्ष यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे. हे अर्ज भरण्याची अंतिम तारीख 10 ऑगस्ट पर्यंत आहे व हे अर्ज जे इच्छुक उमेदवार भरतील त्यांची मुलाखाती साठी कार्यक्रमाची तारीख कळविली जाईल.