मुर्तिजापुर :- ईद उल अजहा ची विशेष नमाज येथील ईदगाह आणि कब्रस्तान याठिकाणी पार पडली. यावेळी समस्त जगात शांतता नांदू दे आणि आपल्या देशाची प्रगती होऊ दे अशी प्रार्थना अल्लाकडे मुस्लिम बांधवांनी केली. सकाळी साडेआठ वाजता च्या सुमारास स्थानिक मोमिनपुरा जामा मज्जीद येथून सर्व मुस्लिम बांधव येथील पोलिस स्टेशन जवळ असलेल्या ईदगाह मैदानावर पोहोचले.
त्याठिकाणी मौलाना आयुब यांनी ईद उल अजहाचे महत्त्व विषद केले.तर जामा मशिदीचे इमाम सय्यद जफ्फर हुसेन खतीब यांनी ईद उल अजहा नमाज पठाण केली. आणि अल्लाकडे भरपूर पाऊस पडू दे, सुख शांती नांदू दे अशी दुवा मागितली. यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा व्यक्त केल्या. तर कब्रस्तानात जाऊन आपल्या पूर्वजांना आठवण करून त्यांच्यासाठी देखील दुवा मागितली.
शहरात दोन इदगाह आणि स्टेशन विभागातील मज्जित येथे जमा झाल्यानंतर येथील राष्ट्रवादी पार्टीच्या वतीने कोल्हापूर सांगली याठिकाणी आलेल्या भीषण नैसर्गिक आपत्तीचा फटका बसलेल्या बांधवांसाठी वर्गणी जमा करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी मोठा प्रतिसाद देत जवळपास१७ ते १८ हजार रुपये जमा झाल्याचे सांगण्यात आले.
यावेळी हिंदू-मुस्लीम बांधवांचे संख्या मोठ्या प्रमाणात होती. सर्वांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. ईद निमित्त शहरात पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.