मुतिजापूर प्रतिनिधी :-मुतिजापूर नगरपरिषद मध्ये बोगस जातीच्या आधारे दाखला सादर करून उदूँचे शिक्षक नगर परिषद उदूँ शाळेवर आजही काम करीत आहे. संपूर्ण अकोला जिल्ह्यात बैना, तडवी या जातीच्या लोकांचा अधिवास नाही. पण मुतिजापूर शहरात राहणार्या तीन उदूँ शिक्षकांनी वरील जातीचे खोटे प्रमाणपत्र मिळविले व त्या आधारे जि. प. अकोला व नगरपरिषद मुतिजापूर ची फसवणूक केली खोट्या व बोगस जातीच्या दाखल्यावर हे तीनही शिक्षक आजही काम करीत असून त्यांनी आतापर्यंत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. याविरूद्ध स्थायी समितीचे सदस्य तथा नगरसेवक तसलीमखाँ यांनी आवाज उठवला आहे .ख-या अनु. जमातीच्या शिक्षकांवर अन्याय होत असून या बोगस शिक्षकांना सेवेतून बडतर्फ करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली असून तसे निवेदन राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री,आयुक्त,तथा जिल्हाधिकारी, यांना दिलेले आहे. आजपयैंत वारंवार लेखीतक्रार करून देखील संबंधितांना वाचविण्यासाठी प्रयत्नशील असणा-या तत्कालीन मुख्याधिकारी व शिक्षणाधिकारी न पा मुतिजापूर यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी. कारण शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशाचे पालन करण्यात आले नाही.
आयुक्त कार्यालयाने याची दखल घेतली आहे. या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी व नगरपरिषद मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे. नगरपरिषदेने या शिक्षकांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणेबाबत अंतीम नोटीस बजावली आहे. ख-या आदिवासींना न्याय न मिळाल्यास व बोगस उदूँ शिक्षकांना सेवेतून बडतर्फ न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तसलीमखाँ यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले आहे. इतर नगरपरिषदांनी अशा बोगस शिक्षकांना सेवेतून बडतर्फ केले आहे हे विशेष. या बोगस शिक्षकांवर नगरपरिषद कोणती कारवाई करण्यात येते. याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.