कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार-- दुचाकीस्वार अडकून गेल्याने दोन ते तिनं किलोमीटर अंतरावर सापडला.


मुर्तिजापूर प्रतिनिधी :- महिंद्रा कंपनीचे  युवराज ट्रॅक्टर घेऊन अमरावतीकडे निघालेल्या कंटेनरने दुचाकीस्वारास धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील कलकत्ता ढाब्याजवळ घडली.सदर अपघात हा दि.१० च्या रात्री साडेदहा वाजता च्या सुमारास घडला. याबाबत प्राप्त माहितीनुसार राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील कलकत्ता ढाब्याजवळ दि.१० चे रात्री १०.३० वाजताचे   मोटर सायकल चा अपघात झाल्याचे कलकत्ता ढाब्याचे चौकीदार     भाऊराव यांच्या लक्षात आले. त्याने आपल्या बॅटरीच्या उजेडात ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणापर्यंत जाऊन पाहिले असता त्या ठिकाणी फक्त तूटफूट झालेली मोटरसायकल क्रमांक एम.एच.२७ --सीई--१८७१ दिसून आली.

पण जवळपास पाहीले असता मोटरसायकलस्वार दिसून आला नाही. चौकीदार याने सदर प्रकार ढाबा मालक सतनामसिंग यांना सांगितली.ढाब्याजवळ अपघात झालेला असून मोटसायकल आहे.पण मोटरसायकल वर असलेला मनुष्य कुठेही दिसत नाही. ढाब्याचे मालक सतनामसिंग गिल यांनी त्वरित याबाबत ग्रामीण पोलीस स्टेशनला माहिती दिली. त्यानुसार ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता ढाब्या पासून काही अंतरावर मोटरसायकल पडलेली होती. तर मोटारसायकल स्वार आढळून आला नाही.पोलिसांनी पुढेे शोध घेतला असता म्रुतदेेह दोन ते तीन किलोमीटरवर मिळाला.

सदर मोटर सायकलस्वाराचे नाव नितिन सुधाकर डाबेेेराव रा.पळसो बढे,ता.जि.अकोला असल्याचेे समजले.ते अमरावती येथे सद्या  राहतात.पळसो येथे देवाच्या पुुुजेचा कार्यक्रम आटोपून ते परत अमरावती येथे येत असताना कंटेनर क्र.एन.एल.०१--एबी--१९३९ च्या चालकाने निष्काळजीपणानेे कंंटेनर चालवत    त्यांंना धडक दिली. त्यानंतर कंटेनर रात्री ताब्यात घेऊन पोलिसांनी कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.   पुुुढील तपास पो.हे.काँ.तेजराव तायडे करीत आहेे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post