पथविक्रेता व फेरीवाला कामगारांचा उपविभागीय कार्यालयावर मोर्चा


मुर्तीजापुर ( प्रतिनिधी) स्थानिक असंघटित कामगार काँग्रेस मूर्तिजापूर च्या वतीने कामगारांच्या विविध मागण्यासंदर्भात विक्रेता व फेरीवाला कामगारांच्या मोर्चा उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर निघाला होता. विक्रेता व जीविका संरक्षण व विक्री विनिमय अधिनियम 2014 2016 या कायद्याची अंमलबजावणी करणे महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत स्तरावर पथविक्रेता समितीचे गठण पथविक्रेता फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी होईपर्यंत. पथ विक्रेत्यांना जुन्याच जागेवर विक्री करण्याचा हस्तक्षेप करू नये याबाबतचे निवेदन.


 आज दिनांक 21 जानेवारी रोजी शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन सदर मोर्चाचे नेतृत्व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष असंघटित कामगार काँग्रेसचे मोहम्मद बदरुज़्ज़मा शहर अध्यक्ष दिनेश दुबे तालुकाध्यक्ष बाळासाहेब बाजड जिल्हा उपाध्यक्ष अज़हर अली नवाब अकबर हुसेन अमजद हुसेन नगरसेवक भारत जेठवानी आणि वासुदेवराव  बोळे तोसिफ खान कविता पवार वर्षा महाकाळ भूमिका भोजने सहा असंख्य पथविक्रेता फेरीवाले महिला कामगार मोर्चात सहभागी झाल्या होत्या. मोर्चाचे आयोजन कामगार सेल चे अध्यक्ष नितीन गायकवाड व निरीक्षक सोहेल शेख यांनी केले होते .

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post