मुर्तिजापूर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचा समारोप


मुर्तिजापूर :-मुर्तिजापूर तालुकास्तरीय जि.प.अधिकारी , कर्मचारी निवड चाचणी क्रीडा स्पर्धा   दि. ७ , ८ व ९ जानेवारी रोजी तालुका क्रीडा संकुल व जि.प.माध्यमिक शाळा येथे घेण्यात आली या कार्यक्रमाचे उद्घाटन ७ जानेवारी रोजी करण्यात  आले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटाशिक्षणाधिकारी श्याम राऊत , उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून सहायक प्रशासन अधिकारी अभिजित बन्नोरे ,ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी स्मिता घावडे , सहायक लेखाधिकारी कहार , आखरे , गटसमन्वयक कैलास सोळंके , केंद्रप्रमुख हेमंत कुळकर्णी , दिनेश बागडे , सर्व शिक्षक संघटनांचे जिल्हा व तालुका पदाधिकारी , केन्द्र प्रमुख , मु.अ. , शिक्षक , सर्व विभागाचे कर्मचारी उपस्थित होते    जिल्हास्तरीय सामन्यांमध्ये तालुकास्तरीय संघ निवडण्यासाठी गटविकास अधिकारी गजानन अगर्ते यांच्या अध्यक्षतेखाली क्रीडा समिती स्थापन करण्यात आली असून या समितीमध्ये सहायक गटविकास अधिकारी डॉ.विजयकुमार वानखडे , तालुका आरोग्य अधिकारी , बांधकाम अभियंता , पशुधन अधिकारी , महिला व बालकल्याण प्रकल्प अधिकारी , पाणीपुरवठा अभियंता , इ.चा समावेश असून सदस्य सचिव म्हणून गटशिक्षणाधिकारी श्याम राऊत व कार्यवाहक म्हणून गटसमन्वयक  कैलास सोळंके काम पाहत आहेत               या तीन दिवसीय स्पर्धेदरम्यान सर्व सांघिक महिला व पुरुष संघ , वैयक्तिक स्पर्धा व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये सर्व सहभागी खेळाडूंचे  उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन पाहून संघ निवडण्यात आला आहे , या सर्व  संघाचा सराव लगेच सुरू केला जाईल.                  तालुकास्तरीय खेळ व क्रीडा स्पर्धा निवडचाचणी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गटसमन्वयक व कार्यवाहक कैलास सोळंके यांच्या नेतृत्वात सर्व केन्द्रप्रमुख , सर्व संघटनांचे पदाधिकारी , मुख्याध्यापक , शिक्षक , विशेष शिक्षक , साधन व्यक्ती , पं.स. व इतर विभागाचे  कर्मचारी , अंगणवाडी सेविका व मदतनीस इत्यादींनी परिश्रम घेतल्याचे इर्शाद हुसेन खान यांनी कळविले आहे

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post