विलास नसले
मूर्तिज़ापुर :- स्थानिक नगर परिषदेच्या स्थायी समिती व विषय समित्यांच्या नामनिर्देशन आणि सभापतीपदाची निवडणूक कार्यक्रमानुसार आज दिनांक ८ जानेवारीला निवड प्रक्रिया येथील नगरपरिषदेच्या सभागृहात पार पडली. स्थायी समिती सभापतीपदी नगराध्यक्षा सौ. मोनाली गावंडे तर समितीचे सदस्य म्हणून सचिन देशमुख, द्वारकाप्रसाद दुबे, सौ. सरिता राहुल पाटील, ममता महाजन, अफरोजाबी अब्दुल कलाम, तसलीमखा बिस्मिल्लाखा यांची निवड झाली. यातील दोन सदस्यांची निवड दोन विषय समिती सदस्यपदी झाल्यामुळे स्थगित करण्यात आली. उपाध्यक्ष तथा नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी सचिन देशमुख यांची अविरोध निवड झाली. या समितीच्या सदस्यपदी लक्ष्मी गोळे, आलीया तबस्सुम,प्रशांत डाबेराव, आशिष बरे, रवींद्र इंगळे यांंची निवड झाली. सार्वजनिक बांधकाम समिती सभापती म्हणून स्नेहा गजानन नाकट तर सदस्यपदी सौ. मंदाताई जळमकर, प्रशांत डाबेराव, आलीया तबस्सुम नसिरुद्दीन, विनायक गुुल्हाने, सौ.प्रतीक्षा वसुकार यांंची निवड झाली. शिक्षण सभापती म्हणून द्वारकाप्रसाद दुबे यांची निवड झाली. या समितीच्या सदस्यपदी सुनिल पवार, सौ मंदाताई जळमकर, धनश्री भेलोंडे, वैभव यादव, रवींद्र इंगळे यांंची निवड झाली. त्याचप्रमणे स्वच्छता वैद्यक आणि आरोग्य सभापती पदी सौ.ममता कैैैलास महाजन यांची निवड झाली. तर या समितीच्या सदस्यपदी भारत जेठवाणी व कविता गुल्हाने,धनश्री भेलोंडे, अनिसाबी शेख खलील,तस्लीमखान यांंचा समावेश आहेे. शहराच्या पाणीपुरवठा व जलनि:स्सारण समितीच्या सभापतीपदी सौ.सरिता राहुुल पाटील तर सदस्य पदी सौ. कविता गुल्हाने, सुनिल पवार, आणि आशिष शंकर बरे, सौ सुनीता गुल्हाने यांंचा समावेश आहे.
महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी अब्दुल कलाम आणि उपसभापती म्हणून मनुबाई मधुकर तानकर यांची निवड झाली. सदस्यपदी लक्ष्मी गोडे, धनश्री भेलोंडे, अनिसाबी शेख खलील, सौ.सुनिता गुल्हाने यांची निवड करण्यात आली. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अभयसिंह मोहिते, सहाय्यक म्हणून मुख्याधिकारी विजय लोहकरे तसेच प्रशासन प्रमुख म्हणून फुरसुले यांनी कामकाज पाहिले.