इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- शिवसेना युवा नेते किरण गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त लोहारा तालुका शिवसेनेच्यानतीने सद्याची दुष्काळ परिस्थितीची गांभीर्य लक्षात घेवुन सामाजिक उपक्रम राबवित दहावी व बारावीच्या परिक्षा जवळ आल्याने विद्यार्थ्यांना मदत म्हणुन लोहारा शहरातील वसंतदादा पाटील हायस्कुल, नेताजी सुभाषचंद्र बोस क.महाविद्यालय, वसंतराव काळे विद्यालय, हायस्कुल लोहारा या शाळेत पँड व पेनचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास शिवसेना तालुका प्रमुख मोहन पणुरे, नगरसेवक शाम नारायणकर, शहरप्रमुख सलीम शेख, नगरसेवक तथा गटनेते अभिमान खराडे, माजी नगराध्यक्ष सौ.पोर्णिमा जगदिश लांडगे, शेतकरी सेना तालुका प्रमुख शेखर पाटील, प्राचार्या उर्मिला पाटील, मुख्याध्यापक बाळासाहेब पाटील, मुख्याध्याध्यापक सुधाकर पांचाळ, डी.एम.पोतदार, एस.डी.शिंदे, गोपाळ सुतार, युवक शिवसेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, प्रमोद बंगले, नामदेव लोभे, उमेश गोरे, राजेंद्र रवळे, कुर्बान खुटेपड, कुलदिप गोरे, भरत सुतार, नितीन जाधव, बालाजी माशाळकर, यांच्यासह शहरातील व तालुक्यातील शिवसैनिक, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.