मूर्तिज़ापुर :- देशाच्या प्रगतीमध्ये काँग्रेसचा मोठा वाटा असून आरएसएस आणि भाजपाने आम्हाला रामाच्या बाबतीत शिकवू नये. आमच्या मुखात आणि मनात राम आहे. पाकिस्तानची फाळणी काँग्रेसच्या शक्तिशाली पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात झाली . काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने राहून या निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार विजय होण्याकरता सर्व ते प्रयत्न करावेत असे प्रतिपादन डॉक्टर अभय पाटील यांनी केले ते मूर्तिजापूर येथे जनसंपर्क यात्रेनिमित्त आले असता मूर्तिजापुर तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने आयोजित मेळाव्यात बोलत होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष असंघटित कामगार कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष मो. बदरूज़्ज़मा होते. कार्यक्रमाचे उद्घाटक अकोला जिल्हा कॉंग्रेस चे उपाध्यक्ष राजेश भारती होते . प्रमुख उपस्थिती जिल्हा सरचिटणीस प्रकाश तायड़े , मनपा नगर सेवक तथा युवक प्रदेश सचिव पराग कांबळे , युवक कॉंग्रेस जिल्हा अध्यक्ष महेश गणगणे , अनुसूचित जिल्हा अध्यक्ष महेंद्र गवई , अल्पसंख्यंक जिल्हा अध्यक्ष रफीक पटेल , अकोला महानगर अध्यक्ष अंशुमन देशमुख , कामगार कॉंग्रेस जिल्हा अध्यक्ष दिलीप नारे , जिल्हा घरेलू महिला कामगार कॉंग्रेस समन्वयक कविता पवार , महिला तालुका अध्यक्ष पल्लवी देशमुख , महिला शहर अध्यक्ष ॲड. मेघा दज्जुका , जिल्हा महिला उपाध्यक्ष माधुरी गावंडे , शहर अध्यक्ष दिनेश दुबे , जिल्हा उपाध्यक्ष जमील कुरेशी , बंडू डाखोरे , राजू गुल्हाने , पंचायत समिती उपसभापती उमेश मडगे , अशोक दुबे , शिवकुमार दुबे , तौसिफ खान , कुद्दुस , दिपक खंडारे , नितिन गायकवाड़ , स्वपनिल गणगणे , संजय पालीवाल , मंगेश क्वठकर , विनोद प्रजापति , भूषण लोहकपुरे , रोहित सोलंके, सुनील वानखडे शहाबोद्दीन,
अमोल लातूरकर , अंनता पांडये , रितेश शेंद्रकर , अल्ताफ खान , सागर दुबे , व स्थानीय नागरिक कॉंग्रेस चे पद अधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.
या कार्यक्रमा मध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश झाला , तसेच मूर्तिजापुर शहरातील पत्रकार बांधवांचा सत्कार आणि सम्मान करण्यात आला.
तसेच या कार्यक्रमा मध्ये असंघटित कामगार कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष मो . बदरूज़्ज़मा यांचे हस्ते विविध स्थानीय लोकांची नियुक्ति करण्यात आली.
कार्यक्रमाचे संचालन शहर महासचिव सोहेल शेख यांनी केले व आभार शहर अध्यक्ष दिनेश दुबे यांनी व्यक्त केले.