व्याख्यानमालेत आज विवेक घळसासी यांचे विचारमंथन


 मूर्तिजापूर :- येथील स्वामी विवेकानंद विचार मंचद्वारा आयोजित व्याख्यानमालेत उद्या(ता.१३) अमृतवक्ता विवेक घळसासी एका अतिशय महत्वाच्या विषयावर प्रबोधनपर विचारमंथन करणार आहेत. या तीन दिवशीय व्याख्यानमालेचे तिसरे व अंतिम पुष्प गुंफतांना ते 'मुकी होत चालली घरे', या विषयावर व्याख्यान देतील. वाक्ता दशसहस्त्रेषु आणि अमृतवक्ता म्हणून सर्वदूर परिचीत असणारे घळसासी तत्वज्ञानाचे अभ्यसक आहेत.एका मोठ्य दैनिकाच्या सोलापूर आवृत्तीचृ त्यांनि १५ वर्षे संपादन केले आहे. त्यांचे संतसाहित्याचे रसाळ निरूपण आणि श्रीमद्भागवत कथा व रामकथा निरूपण देशातच नाही, तर देशाबाहेरही वाखाणल्या गेले आहे. पुष्पांजली, राष्ट्रवाद, नित्यनिरूपण, युवाचेतना स्वामी विवेकानंद ही त्यांची ग्रंथसंपदा आहे. व्याख्यान संध्याकाळी सात वाजता वेळेवर सुरू होईल, त्यामुळे रसिक श्रोत्यांनी वेळेपूर्वी राधामंगलम् सभागृहात उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post