सिद्धार्थ विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न


मुर्तिजापूर प्रतिनिधी :- येथील सिद्धार्थ विद्यालय तसेच सिद्धार्थ कनिष्ठ कला महाविद्यालय व गोल्डन किड्स काँन्वेंंट यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेहसंमेलनाचा सोहळा घेण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष संजय तायडे यांची उपस्थिती होती. शाळेच्या सांस्कृतिक वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन ठाणेदार आव्हाळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून नायब तहसीलदार वैभव फरताळे, संजय ईसाळकर, संस्था सचिव गोवर्धन जामणिक, प्राचार्या सौ. अर्चना तायडे, मुख्याध्यापिका मंजुषा टाले या सर्व मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य सौ.तायडे यांनी केले.

तर ठाणेदार आव्हाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, शिक्षक व विद्यार्थी यांचे नाते अतूट असते, ते जपावे व स्पर्धेत टिकून राहण्याकरिता परिश्रम करावे.यावेळी आपले अध्यक्षीय विचार व्यक्त करताना संजय तायडे यांनी देखील विद्यार्थ्यांच्या सुप्तकलागुणांना समोर आणण्या करता व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कार्य शाळा करते.

विद्यार्थ्यांमधून कलाकार निर्माण झाले तर निश्चित ती सर्वात सम्मानाची बाब ठरेल असे मत व्यक्त केले.नर्सरी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध न्रुत्यांचे अत्यंत सुंदर असे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे संचालन शहाकर मॅडम यांनी केले. तर प्रा.पंत सर यांनी आभार व्यक्त केले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीकरिता शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post