1
लोहारा/प्रतिनिधी :- उस्मानाबाद शहरातील अल्पावधीत सभासदांच्या विश्वास संपादित केलेली, दिशा नागरी सह.पतसंस्थेच्या 2019 वर्षीच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन पुष्पक पार्क, उस्मानाबाद येथे करण्यात आले.प्रकाशनाचे वैशिष्ट्य म्हणजे जिल्ह्याला योगदान दिलेल्या बारा दिवंगत व्यक्तींच्या कार्याचा गौरव त्यांच्या प्रतिमेसह करण्यात आला आहे. यावेळी झुंझार स्वातंत्र्य सेनानी भाई उद्धवराव पाटील, स्वातंत्यसेनानी अँड फुलचंद गांधी, शिक्षणमहर्षी श्री.बापुजी साळुंके, हुतात्मा श्री.बापुराव बोरगावकर, कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे, क्रुषितज्ञ शिवाजीराव साळुंके, डॉ.संपतराव जाधव, आ. कलीमोद्दीन सिद्दीकी, स्वांतत्रसेनानी रामभाऊ जाधव, क्रिडामहर्षी शिवाजीराव नलावडे,
इजि.प्रभाकरकाका नळदुर्गकर,मा.तुकाराम भोसले, यांचा गौरव करण्यात आला.
या प्रकाशन सोहळ्यासाठी दिनदर्शिकेत उल्लेखलेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील सदस्य आवर्जून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उस्मानाबाद शहराचे माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील होते. तर यावेळी प्रमुख म्हणुन संस्थेचे अध्यक्ष डॉ.दापके-देशमुख दिग्गज, बाल रोग तज्ञ डॉ. अभय शहापूरकर, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, छत्रपती शाहू शिक्षण संस्थेचे सचिव धनंजय पाटील, श्री श्री रविशंकर विद्यालयाचे नितीनदादा भोसले, रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य जयसिंग देशमुख, दिशा पतसंस्थेचे सचिव पंकज पडवळ, अदि उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविक भाषण करताना संस्थेचे अध्यक्ष डॉ.दापके-देशमुख दिग्गज यांनी नवीन पिढीतील युवकांना या महान व्यक्तींनी जिल्ह्याच्या प्रगतीसाठी योगदानाबद्दल माहिती व्हावी हा उद्देश आहे असे सांगितले.
2
दिनदर्शिकेची संकल्पना प्रा.सतिश कदम यांची आहे,असे शेवटी सांगीतले.यावेळी माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत, या व्यक्तींनी खडतर परिस्थितीत जिल्ह्याच्या प्रगतीसाठी केलेल्या संघर्षाबद्दल माहिती सांगितली. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्था अध्यक्ष डॉ.दापके देशमुख दिग्गज व सूत्रसंचालन शेळके मँडम यांनी केले तर आभार उपाध्यक्ष राहूल माकोडे यांनी मानले. या कार्यक्रमास चिलवडीचे बुवासाहेब जाधव, विजयसिंह जाधव, अरविंद जाधव, बाळासाहेब पाटील, अँड.अविनाश देशमुख (काटीकर), डॉ. रमेश दापके, लॉ कॉलेज चे प्राचार्य चौधरी सर, डॉ.ए.एम.देशमुख, प्राचार्य मनेर सर, प्रा. अशपाक सर, प्रगती पतसंस्थेचे प्रशांत पाटील, बाल कल्याण समिती चे अध्यक्ष डॉ.ए.डी.
कदम, प्रा.गुंड सर, उस्मानाबाद जिल्हा महिला पतसंस्थेचे नागनाथ नागने, सतीश कोळगे, शशीकांत करंजकर, अँड.दत्ता आवारे, दत्ता मुगळे, सतीश जाधव, प्रा.अभिमान हंगरकर प्रा.शेरखाने सर, डॉ.धिरज वीर, विभुते अप्पा, अर्शद रझ़वी, उमाकांत आगरे, अंजुमन हेल्थकेअर केअर सो.चे अध्यक्ष फिरोज पल्ला, प्रहार संघटनेचे मयूर काकडे, उमेश राजे निंबाळकर, सागर साळुंखे, अँड.नाजीम सिद्दिकी, आयाज सिद्दीकी, जमाते इस्लामी हिंद चे शजीयु युद्दीन शैख, मैनुद्दिन पठाण, संतोष नलावडे, सूरज पडवळ, उपळा(मा) चे उपसरपंच अमरसिंह पडवळ, सुधाकर पवार, यांच्यासह संस्थेचे संचालक, सभासद, खातेदार, कर्मचारी, हितचिंतक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.