बिकानेर व गितांजली एक्सप्रेसल ला थांबा देण्याची प्रवासी व विद्यार्थ्यांची मागणी.



  •  शेकडोंच्या स्वाक्षरींंचे दिले निवेदन.                                  

मुर्तीजापुर :- मध्य रेल्वेच्या नागपूर ते भुसावळ दरम्यान महत्त्वाचे जंक्शन रेल्वे स्टेशन असलेले आणि येथून मध्यप्रदेश सिमेकडे परतवाडा पर्यंत आणि आंध्रप्रदेश सिमेजवळील यवतमाळ पर्यंत तसेच नांदेडच्या अगदी जवळ पर्यंत म्हणजे पुसद पर्यंत चालणारी ऐतिहासिक आणि इंग्रज कालीन शकुंतला नँरोगेज रेल्वे या स्थानकावरून धावत होती.आताा तिला देखील अखेरची घरघर लागली आहे. महान संत गाडगे महाराज यांची मुर्तिजापुर ही कर्मभूमी आहे. या स्थानकावर नागपूर ते मुंबई दरम्यान धावणार्‍या अनेक जलद गाड्यांंना रेल्वे विभागाने थांबा दिलेल्या नाही.भोके पडलेल्या बकेटीतूूून पाणी गळून पडते तसेच मुर्तिजापूूरकरांंच्या मागण्यांचेबाबतीत होत आहे.ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार आणि संतांची कर्मभूमी असलेल्या मुर्तीजापुर शहराला अवकळा आलेली असून लोकप्रतिनिधींनी मात्र याकडे सपशेल दुर्लक्ष करीत डोळे झाकून घेतले असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.                         या रेल्वे स्थानकावर सिकंदराबाद--बिकानेर एक्सप्रेस(१७०३७) आणि गितांजली एक्स्प्रेसला दोन मिनिटांचा थांबा द्यावा किंवा विनंती थांबा द्यावा, अशी मागणी दि.३०/९/२०१९ रोजी येथील स्टेशन अधीक्षकांना मुर्तिजापूर अप-डाऊन मंच व विद्यार्थी वर्ग यांचेवतीने शेकडोंंच्या स्वाक्षरीचे  निवेदन देऊन करण्यात आली. मध्य रेल्वेच्या नागपूर येथून चालणारी पॅसेंजर क्र.५२२८६ नागपूर-- भुसावळ पॅसेंजर दि.१/१/२०१९ पासून दि.३१/१/२०१९ पर्यंत बंद ठेवण्यात आल्याने  स्टेशनवरून शेकडोच्या संख्येने येणे-जाणे करणारे प्रवाशी व चाकरमाने आणि  विद्यार्थ्यांना मोठी ससेहोलपट करावी लागली.अनेकांना बसने किंवा प्रायव्हेट वाहनांनी येण--जाणे शक्य नसल्याने त्यांना येता आले नाही.त्यामुळे पॅसेंजर देखील तात्काळ सुरू करा अशी मागणी देखील करण्यात आलेली आहे.निवेदन देते वेळी जयदीप     सोनखासकर,राजेश ठाकूर,विलास नसले, पुष्पा पालीवाल , सुनंदा परांजपे, श्रीकृष्ण कोकणे, विलास नागदिवे सर, शहाकर मॅडम,महेश इंगळे, हेमंत कुळकर्णी, अरूण हांडे आदींची निवेदन देतेवेळी उपस्थिती होती.सव्वा दोनशे लोकांच्या स्वाक्षरीचे निवेदन यावेळी देण्यात आले. सदर मागणी मान्य न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा प्रवासी वर्ग व विद्यार्थी यांच्या वतीने देण्यात आलेला आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post