इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- टाटा सामाजिक विज्ञान संस्था तुळजापूर येथील बी.एस.डब्ल्यू. प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी चाईल्ड-लाईन उस्मानाबाद या कार्यालयास सदिच्छा भेट दिली.
यावेळी संस्थेचे संचालक डॉ.दापके-देशमुख दिग्गज यांनी बालकामगार, बालविवाह, बालगुन्हेगार, बालभिक्षेकरी,बालविवाह, बेवारस, आजारी, यांना मदतीची गरज असणाऱ्या 0 ते 18 वयोगटातील मुलांसाठी चाईल्ड-लाईन 1098 या टोल फ्री नंबरच्या सहाय्याने कार्यालयातून टिममेंबरच्या मदतीने त्यांचे कशा प्रकारे पुनर्वसन केले जाते, या बद्दल विद्यार्थ्यांशी संवाद साधत कामकाजाविषयी सविस्तर माहिती सांगितली.
या प्रसंगी टाटा सामाजिक संस्थेचे क्षेत्रीय कार्य समन्वयक प्रा.आनंद भालेराव, चाईल्ड-लाईनचे टिम मेंबर ज्ञानेश्वर गिरी, अनिल जाधव, बालाजी कानवटे, सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हाँस्पीटल्सचे प्रशासकीय अधिकारी संतोष पवार आदी उपस्थित होते.