मुर्तीजापुर :- आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त मुर्तिजापूर येथील पत्रकारांद्वारा बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन आणि ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. मूर्तिजापूर येथील सर्व पत्रकारांच्या वतीने तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा आज सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
ग्रामीण पत्रकार संघाचे राज्याचे उपाध्यक्ष पी.एन.बोळे यांची उपस्थिती होती. तर व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार मधुकरराव खोकले, मनोहररावजी पाठक, तानाजी चिकणे, प्राध्यापक ज्ञानेश्वरराव ढेरे, एकनाथजी भड, संजय फडनाईक,अशोकराव दुबे ,चंद्रकांत मोकाशे यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाला दिपप्रज्वलन करून व बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन प्रारंभ झाला.मूर्तिजापूर येथील दिवंगत ज्येष्ठ पत्रकार नंदलालजी अग्रवाल आणि स्व. युवा पत्रकार गणेश देशमुख यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.येथील समस्त पत्रकारांच्या वतीने तालुक्यातील जेष्ठ पत्रकारांना सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी बहुजन पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल मुन्ना महाजन,विज्युक्टाचे कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रा.दीपक जोशी, ग्रामीण पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल प्रा.एल.डी.सरोदे आणि ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल विलास नसले यांचा देखील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा. अविनाश बेलाडकर यांनी केले तर उपस्थित सर्व पाहुण्यांचा परिचय विलास नसले यांनी करून दिला. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार विकास सावरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सत्कारमूर्तींच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार प्रा.ज्ञानेश्वर ढेरे यांनी आपले विचार व्यक्त केले व पत्रकारांनी एकजुटीने परिश्रमातून पत्रकारिता करावी असे आव्हान केले. तर आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना पी.एन.बोळे यांनी आपले विविध अनुभव कथन केले. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार तथा सत्कारमूर्ती मधुकरराव खोकले यांच्या सूचनेवरून अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांचा निषेध करण्यात आला. सूत्रसंचालन दिलीप देशमुख यांनी केले. आजच्या पत्रकार दिनी आमदार हरीष पिंपळे, नगराध्यक्ष मोनाली कमलाकर गावंडे व भारतीय जनता पार्टीच्या वतीने कमलाकर गावंडे, सतीशचन्द्र शर्मा, नगरसेवक सचिन देशमुख, हर्षल साबळे,गजानन नाकट, राम जोशी, निलेश वानखडे, सुधिर दुबे,भटकर यांच्या हस्ते पत्रकारांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी /अधिकारी संघटना जिल्हा अकोल्याच्या वतीने दिलीप सरदार सर, सुधीर कडू पत्रकारांचा सत्कार केला व शुभेच्छा दिल्या. गाडगे महाराज अन्नछत्र उपक्रम राबवित असलेले सामाजिक कार्यकर्ते रवी राठी यांनी उपजिल्हा रुग्णालयात पत्रकारांच्या हस्ते अन्नदान करून पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या व सत्कार केला. पत्रकार दिनानिमित्त मूर्तिजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिर घेण्यात आले. समारंभाला पत्रकार विकास सावरकर, अनिल अग्रवाल, मुन्ना महाजन, दीपक अग्रवाल, प्राध्यापक दीपक जोशी, प्राध्यापक अविनाश बेलाडकर, सुभाष बोदडे, ज्ञानेश देशपांडे, जयप्रकाश रावत, उमेश साखरे, संजय उमक, गौरव अग्रवाल, संतोष माने, अंकुश अग्रवाल, विशाल नाईक, अन्वरखान, नरेंद्र खवले, निलेश सुखसोहळे,मोईज शेख, प्रकाश श्रिवास, बबलू यादव, रवी शिंदे, अथरखान, गजानन गवई ,अजय प्रभे, श्याम काकडे, शारीक कुरेशी, रिजवान सिद्दिकी, सोहेल शेख, अतुल नवघरे, अनिल भेंडकर, साखरे, सुवाती राजुरकर, विलास वानखडे आदी उपस्थित होते.