मुर्तीजापुर प्रतिनिधी :- शहर पोलिसांची काल दि.५/१/२०१९ च्या रात्रीतून गस्त सुरू असतांना पहाटेच्या सुमारास एका ४०७ ट्रकचा गस्ती पथकातील पोलिसांना संशय आला. पोलिसांनी सदर गाडीचा पाठलाग सुरू केला असता पोलिसांना पाहून चालकाने राष्ट्रीय महामार्गाच्या सोनाळा फाट्याजवळून खडकपुरा भागाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ट्रक वळविला. पोलिसांनी सदर गाडीचा पाठलाग सुरू केला असता सदर ४०७ चालकाने खडकपुरा भागात एका उभ्या असलेल्या ऑटोला धडक मारली आणि त्यामध्ये ट्रक पलटी झाला. ट्रक पलटी झाल्यानंतर पोलीसांच्या धाकाने गाडीतील अज्ञातांनी पोबारा केला.सदर ट्रक मधे २५ जिवो टाँवरच्या बँट-या आढळून आल्या. पोलिसांनी जेसीबी द्वारे गाडी क्र.एम.एच.,०४--सी.जी.४८२५ ला सरळ करून पोलिस स्टेशन मध्ये आणले. गाडीमध्ये जिओच्या बँट-या अंदाजे किंमत अडीच लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. काल रात्री गस्तीवर शहर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक जोशी व डि.बी. कर्मचारी असतांना पहाटेच्या सुमारास सदर कारवाई झाली.कारंजा तालुक्यातील बेंबळा-- कामरगाव या परिसरातील टॉवरच्या असल्याचे समजले.गाडीसह एकूण तीन लाख ९१ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पुढील तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जोशी करीत आहेत. शहर पोलिसांनी दोन दिवसात दोन कारवाया केल्या मुळे अशाच ताबडतोब कारवाईंंची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहे.रात्री चोरलेला माल पहाटे पोलिसांनी जप्त केला.लवकरच चोरट्यांना अटक होणार असल्याचे सांगण्यात आले.
जिओ टाँँवरच्या बॅट-या पोलिसांनी दोन तासात केल्या हस्तगत