लोहारा/प्रतिनिधी :- उस्मानाबाद तालुक्यातील कनगरा येथील रहिवाशी असलेले उस्मानाबाद जनता दलाचे युवा जिल्हाध्यक्ष सतीश गुंड यांचा वाढदिवस कनगरा गावामध्ये विविध पक्षाच्या नेतेमंडळीच्या आणि पंचक्रोशीतील युवक मित्रमंडळीच्यावतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कनगरा येथील मूळ रहिवाशी असलेले सतीश गुंड यांची काही महिन्यांपूर्वीच उस्मानाबाद जनता दलाच्या युवा जिल्हाध्यक्ष पदी निवड झाली असून, तेंव्हा पासून ते पक्ष वाढीसाठी युवा वर्गाशी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून संपर्क साधत आहेत, त्यांनी आपल्या विविध कामातून त्यांच्या पक्षश्रेष्ठी कार्याची चुणूक दाखवून दिली आहे, त्यामुळे त्यांच्या 27 व्या वाढदिवसानिमित्त कनगरा गावामध्ये जनता दलाचे जिल्हाध्यक्ष ऍड.रेवन भोसले, उपनगराध्यक्ष सुरज साळुंखे, भाजप नेते रोहन देशमुख, शिवसेनेचे नेते जिल्हा परिषद सदस्य नितीन शेरखाने, जनता दलाचे युवा प्रदेध्याक्ष ऍड.कुलदीप भोसले, नगरसेवक पृथ्वीराज चिलवंत, ऍड.गणपत कांबळे, अमोल पेठे, चेअरमन रवींद्र इंगळे, सरपंच बिरु तिघाडे, उपसरपंच संजय दळवे, ऍड.अजय पाटील, नितीन इंगळे, वैभव इंगळे, सुरज इंगळे, सूर्याजी गायकवाड यांच्या सह पंचक्रोशीतील मित्र मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जनता दलाचे युवा जिल्हाध्यक्ष सतिश गुंड यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त माता पित्यांचे छत्र हरवलेल्या आणि शिक्षण घेत असलेल्या एकूण 10 विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारून त्यांचे शिक्षण पूर्ण होई पर्यंतचा शैक्षणिक खर्च उचला आहे. त्यामुळे गुंड यांनी एक आदर्श असे काम केल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.