विवेकानंद व्याख्यानमालेत आज कुलगुरू डॉ . चांदेकर


मुर्तिजापूर :- स्वामी विवेकानंद विचार मंच मुर्तिजापूर द्वारा आयोजित तीन दिवसीय व्याख्यानमालेत आज दि. ११ जानेवारी रोजी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती चे कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर यांचे व्याख्यान होणार आहे . स्थानिक राधा मंगलम सभागृह तिडके नगर मुर्तिजापूर येथे सायंकाळी ठीक ०७ वाजता  होणाऱ्या त्यांच्या व्याख्यानाचा विषय  " भारतीय शिक्षणाची समग्रता " हा आहे .
              डॉ. चांदेकर यांच्या शैक्षणिक कार्याची सुरुवात नागपूर येथील व्हीएमव्ही आणि जे टी सायन्स कॉलेज येथून झाली .  यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक च्या नियोजन समितीचे ते सदस्य आहेत . या अगोदर त्यांनी गोंडवाना व नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून जबाबदारी सांभाळली आहे शिक्षण क्षेत्रातील विविध मंडळ व समित्यांचे ते सदस्य आहेत . विदर्भातील वनवासी भागात  मेळघाट व गडचिरोली सारख्या नक्षलप्रभावित भागात आदिवासींचा शैक्षणीक स्तर उंचावण्यासाठी स्वयंसेवी संस्थेमार्फत चालविण्यात येणाऱ्या सातशेपेक्षा अधिक एकल विद्यालयांच्या उभारणीत त्यांचा मोठा वाटा राहिला आहे .  त्यांच्या शैक्षणिक कार्यातील भरीव योगदानाबद्दल त्यांना सावरकर स्मारक समिती नागपुर चा प्रतिष्ठेचा समजला जाणारा सामाजिक अभिसरण पुरस्कार सन २००३ साली मिळाला आहे . अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारही त्यांना मिळालेले आहेत .    त्यांच्या आजच्या व्याख्यानाचा विषय महाविद्यायीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरणार आहे . कार्यक्रम नियोजित वेळेवरच सुरू होणार असल्याने श्रोत्यांनी वेळेपूर्वी कार्यक्रम स्थळी उपस्थित राहावे व बहुसंख्येने कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post