मुर्तिजापूर :- येथील नर्मदा बहुद्देशीय संस्थेद्वारा संचालित हँप्पी किड्स स्कूल या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ.अनिता श्रीकांत तिडके होत्या. तर उद्घाटन डॉ.अविनाश गावंडे यांचे हस्ते करण्यात आले.प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण सभापती सुनील पवार, नगरसेविका सरिता राहुल पाटील,सामाजिक कार्यकर्ते गजानन नाकट, महाराष्ट्र संगीत विद्यालय संचालीका तृप्ती श्याम कोल्हाळे नृत्यांगण कथक कला केंद्र संचालिका प्रियंका जोशी सौ.जया ज्ञानेश टाले, नगरपरिषद प्रशासनाधिकारी प्रमोद टेकाडे, सुवर्णाताई सपकाळ,डॉ. राहुल इंगळे,सौ.क्षमा इंगळे, देविका अग्रवाल, सचिन वाकोडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून शाळेच्या पुढील धोरणे याबाबत संस्थेच्या अध्यक्षा सुनीता विष्णू लोडम यांनी विचार मांडले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे, डॉ.अविनाश गावंडे (शिवबा इंग्लिश स्कूल मोठी उमरी), डॉक्टर पंकज राऊत, धीरज अग्रवाल, राम कोरडे, सुनील पवार, प्राचार्य सत्यनारायण तिवारी, सुनील लछुवानी, सत्यनारायण तिवारी, प्रशांत हजारी, रवी राठी, दिनेश श्रीवास,प्रा.अविनाश बेलाडकर, दीपक अग्रवाल, दिवाकर सोनवणे, सुनील जामनिक, रवींद्र जवादे, संदीप संगेले, विलास वानखडे, श्याम कोल्हाळे, के.बी..काळे,करवा सर, डॉ.प्रफुल्ल टोपले, देविदास गोडे, आनंद पवार, तेजस गावंडे, अरुण महाराज मोकलकर, गजानन मोरे, राम जोशी, शंकर लोडम आदी मान्यवरांची उपस्थिती होती. याप्रसंगी शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या स्नेह संमेलन कार्यक्रमात प्ले ग्रुप, नर्सरी व केजी च्या मुलांनी भारतीय संस्कृतीवर आधारित महाराष्ट्रीयन, आदिवासी, पंजाबी, दक्षिणात्य आदी प्रकारचे नृत्य प्रकार सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. तर कु.विभूती विष्णू लोडम हिने शाळेविषयी मनोगत व्यक्त केले. तसेच शाळा परिचय गीत सादर केले. गजानन मोहरीर यांनी पालक संबंधावरील नाटिका सादर केली. विविध स्पर्धांमधील विजेत्यांना यावेळी पारितोषिके प्रदान करण्यात आली. यावेळी प्रा.बेलाडकर, डॉ. गावंडे,नाकट, सुनिल पवार, रवी राठी, धीरज अग्रवाल यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर कवी संमेलन पार पडले. या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे सचिव विष्णू लोडम आणि साईराज मित्र मंडळ यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संतोष लोडम, सचिन वाकोडे, मुख्याध्यापिका राखी पिंजरकर, शिक्षिका राखी चौबे, अमृता बिसेन,आंबेकर ताई,साईराज मित्र मंडळ यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन मुख्याध्यापिका राखी पिंजरकर व विष्णू लोडम यांनी केले.
हॅप्पी किड्स स्कूलच्या स्नेहसंमेलनातून सामाजिकतेचा संदेश.