सकल चर्मकार महासंघाची तालुका कार्यकारणी घोषित


मूर्तिज़ापुर :- येथील पुंडलिक महाराज संस्थान पुंडलिक नगर सिरसो रोड येथे सकल चर्मकार महासंघाची सभा घेण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी माजी पोलीस पाटील एड. सुखदेव तायडे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून महादेवराव गवळी कार्याध्यक्ष म.रा. तसेच प्रकाश चापके महासचिव आणि अकोला जिल्हा अध्यक्ष राजकुमार नाचणे, सौ उषाताई चंदन महिला जिल्हा कार्याध्यक्ष, मुरलीधर भटकर महासचिव अकोला जिल्हा, माजी पंचायत समिती सदस्या सौ. ज्योती मोहोकार यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी तालुकाध्यक्ष व शहर कार्यकारिणी घोषित करण्यात आली. याप्रसंगी महादेवराव गवळे, राजकुमार नाचणे, सौ.उषाताई चंदन, मुरलीधर भटकर यांनी आपले विचार व्यक्त केले. मुर्तिजापूर तालुका कार्यकारणी मध्ये तालुकाध्यक्षपदी विजय तायडे यांची निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे महिला अध्यक्षपदी सौ. ज्योती मोहोकार, युवक आघाडी अध्यक्षपदी श्रीकांत खंडारे, कार्याध्यक्ष शंकरराव नाचने, कोषाध्यक्ष रामेश्वर शेकोकार, महासचिव प्रवीण धामणे, उपाध्यक्ष बाळासाहेब चंदन, शहर उपाध्यक्ष प्रभाकर आंबीलकर, शहर अध्यक्ष सुरेश तायडे, शहर कार्याध्यक्ष संजय देविकर, सचिव वैभव भागवतकर जिल्हा सचिव रामेश्वर तायडे, ज्येष्ठ मार्गदर्शक महादेवराव गाठेकर, तालुका ज्येष्ठ मार्गदर्शक शंकर ढाकरे, सदस्य तालुका कार्यकारणी रमेश नाचणे, कमलाकर नाचणे, प्रसिद्धीप्रमुख वासुदेव शेगोकार यांची निवड करण्यात आली. यावेळी मोहोकार, सुरेश नाचणे, विकास वानखडे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेकरिता संजय नाचणे, प्रभाकर आंबिलकर, नरेश चंदन,शंभर ढाकरे, शुभम नाचणे, त्रिशूल भटकर, गजानन गाठेकर,  दर्शन गाठेकर,महादेव गाठेकर, रामदास तायडे, निरंजन तायडे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन वासुदेव शेगोकार यांनी केले. आभार विजय काळे यांनी व्यक्त केले.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post