मेळाव्याचे उद्घाटन मान्यवरांनी भगवान मुंगसाजी माऊली, छ.शिवाजी महाराज,बिरसा मुंंडा, साविञीबाई फुले,,ज्योतिबा फुले, शाहु महाराज,बाबासाहेबआबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन व दिप प्रज्वलन करुन करण्यात आले. कार्यक्रमाचा ऊद्देश सेवा नि.उपजिल्हाधिकारी रघुनाथ चाफे यांनी प्रास्ताविकातुन मांडला.कार्यक्रमात उप वधुवरांचा परिचय असलेली रेशीमबंध या पुस्तिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . सुप्रसिद्ध साहित्यीक प्रा.राजेश धनजकर यांनी आपल्या अभ्यासपुर्ण मनोगतातून तळमळीने आंध समाजाने अंधश्रद्धेतुन बाहेर पडावे व वैज्ञानिक द्रुष्टिकोन जोपासावा असे सांगितले. समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षित तरुणांनी पुढाकार घ्यावा व समाजाठी योगदान द्यावे असे आवाहनही प्रा.धनजकर यांनी केले.यावेळी आरतीताई फुफाटे, सुरेश धनवे, जानकीराम डाखोरे यांचे समाजाला उद्देशुन समायोचित विचार व्यक्त केले. मेळाव्यासाठी आलेल्या शेकडो उपवर व वधुंनी आपला परिचय दिला.
.तसेच अकोला ,वाशिम, बुलढाणा व यवतमाळ जिल्हयातुन आंध आदिवासी समाजबांधव,महिला भगिनी तसेच अधिकारी ,कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाबाराव साखरे ,प्राचार्य प्रकाश खुळे, रघुनाथ चाफे,काशिराम लोखंडे,संतोष धंदरें,समाधान जावळे,पंडीत पाखरे, गणेश डाखोरे, गजानन हि.नांदे,बबन नांदे सर, गजानन ना.नांदे , अशोक लोखंडे, राजेश डाखोरे,गणेश लोखंडे,दिपकभाऊ झळके,लक्ष्मणराव लोखंडे,रतन लोखंडे,भिकाजी खुळे,
गणेश लोखंडे,शंकर लोखंडे,वसुदेव लठाड,रामदास शिंदे (महाराज), दिपक लोखंडे, गजानन ठाकरे,प्रल्हाद खुळे,महादेव शिंदे, प्रकाश लोखंडे, भाष्कर भोडणे, विजय करवते, अंकुश ठाकरे,टिटवनचे सरपंच जगदेवराव लोखंडे, जांभरुणचे सरपंच श्री.गणेशभाऊ झळके,माजी सरपंच हिरामणजी लोखंडे,माजी जि.प.सदस्य लक्ष्मणराव झळके, माजी सभापती रमेशभाऊ लोखंडे,माजी पं.स.सद्स्य किशोरभाऊ ठाकरे,माजी सरपंच सुपाजी शिंदे , रमेश गि-हे, प्रकाश अंभोरे आदीनी परिश्रम घेतले.
Join Watsap
कार्यक्रमाचे य़शस्वी सुञसंचालन राजेश डाखोरे व सौ.योगिता गोदमले यांनी केले.तर आभार मुकेश ठाकरे यांनी मानले.
