अधिकार्यांच्या लेखी आश्वासनानंतर आमरण उपोषणाची सांगता.



  • हातगाव ग्रा.प.सरपंच व सचिव यांचेविरूद१०दिवसात कारवाई

मूर्तिज़ापुर :- येथून जवळच असलेल्या हातगाव ग्रामपंचायत मधील अपहाराची लेखा परीक्षणामध्ये दर्शवण्यात आलेल्या वसूल पात्र रकमेचे बाबत सरपंच व तत्कालीन सर्व सचिव यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात विलंब होत असल्याने हातगाव येथील सुशील शंकरराव सातव यांनी मूर्तिजापूर येथील पंचायत समिती समोर दिनांक २६ जानेवारी रोजी पासून आमरण उपोषण सुरू केलेहोते.

सदर उपोषण सकाळी १० वाजता पासून सुरू झाल्यानंतर भारतीय प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण झाल्यानंतर येथील उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते तसेच तहसीलदार राहुल तायडे,ना.त. वैभव फडतरे ना.त.श्रीकांत मिसळ, गटविकास अधिकारी गजानन अगर्ते , विस्तार अधिकारी पजई यांनी या ठिकाणी भेट देऊन चर्चा केली.यावेळी धनंजय ढोक,दिग्विजय गाडेकर यासह ईतर मान्यवर उपस्थित होते.अधिकार्यांंनीउपोषणकर्ते यांच्या मागणी नुसार चर्चा केली असता सदरचे प्रकरण जिल्हास्तरावर पुढील कारवाई करता पाठविण्यात आल्याचे सांगितले.

तक्रारकर्ते यांच्या मागणी संदर्भात पुढील तात्काळ कारवाई होण्याच्या दृष्टीने उपमुख्यकार्यकारी अधिकारी(पंचायत) जिल्हा परिषद अकोला यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा करण्यात आली.  सदर प्रकरणात सोमवारी याबाबत आदेश निर्गमित करण्यात येतील असे सांगितले. त्यावरून उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला यांचे कडून आदेश प्राप्त होताच त्यामध्ये दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार पुढील कारवाई करण्यात येईल असे यावेळी उपोषणकर्त्यांची चर्चा करताना सांगण्यात आले.

 त्यामुळे उपोषण मागे घेऊन प्रशासनास सहकार्य करण्याची विनंती उपोषण करते सुशील सातिंगे यांना करण्यात आली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत यांचे पत्र क्रमांक ७४ दि.२५/१/२०१९ नुसार जिल्हास्तरीय समिती कडून कार्यालयीन कामाचे दहा दिवसात समितीकडून अहवाल मागविण्यात येऊन पुढील कारवाई करण्यात येईल.असे लेेेखी देण्यात आले. त्या नंंतर उपविभागीय अधिकारी यांच्या हस्ते निंबु शरबत पाजून सदर उपोषणाची सांगता करण्यात आली. यावेळी सुशील सातिंगे यांनी सांगितले की, जर दहा दिवसाच्या आत कारवाई न झाल्यास पुन्हा आमरण उपोषण करण्यात येईल.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post