तालुक्यातील रस्त्यांच्या दुर्दशेच्या बाबत काँग्रेसचे साखळी उपोषण सुरू.


 मुर्तिजापूर प्रतिनिधी :- मूर्तिजापूर तालुक्यातील अनेक रस्त्यांची वाताहात झाली असून रस्ते खड्ड्यांनी युक्त असे झाले असून सदर रस्ते खड्डे मुक्त करून ग्रामीण भागातील रस्ते वापरासाठी आणि प्रवासासाठी योग्य व्हावेत या उद्देशाने येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर दिनांक २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनापासून साखळी उपोषणाला सुरुवात काँँग्रेसच्या वतीने करण्यात आलेली आहे.                                                                     तालुक्यातील अनेक रस्ते असे आहेत की ज्यांचा काहीही उपयोग नसताना फक्त आपल्या चेलेचपाट्यांना खुश करण्यासाठी लाखो रुपये खर्च करून बनविण्यात आलेले आहेत.तर दुसरीकडे वर्दळींंची गावे आहेत. त्या गावांची लोकसंख्या जास्त असून देखील अशा अनेक गावांचे रस्त्यांंची अवस्था मात्र अद्यापही अत्यंत गंभीर असल्याने अपघात होणे, लोकांच्या शारीरिक व्याधी मध्ये वाढ,कंबर दुखी, मणक्यांचे आजार यामध्ये वाढ होणे असे प्रकार नाहक सहन करण्याची वेळ ग्रामीण क्षेत्रातील जनतेवर येत आहे.लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी आपली भूमिका योग्य रीतीने पार न पाडल्यामुळे लोकांवर अन्याय होत आहे असा आरोप ग्रामीण काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष बबनराव डाबेराव यांनी केला. जनतेच्या समस्यांंना वाचा फोडण्यासाठी दि.२६ जानेवारी पासून या ठिकाणी साखळी उपोषण करण्यात येत आहे.  पहिल्याच दिवशी या ठिकाणी उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते, तहसीलदार राहुल तायडे, गटविकास अधिकारी गजानन अगर्ते, ना.तह.फडतरे,ना.तह.मिसाळ,      सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता वानखडे यांनी भेट देऊन साखळी उपोषण करते काँग्रेसचे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष बबनराव डाबेराव तसेच अशोक दुबे, रोहित सोळंके,शहाबुद्दीन,अमोल तातुरकर यांच्याशी चर्चा केली. परंतु जोपर्यंत याबाबत समाधान कारक मार्ग निघत नाही, तोपर्यंत साखळी उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी केल्यामुळे दुसऱ्या दिवशी देखील हे साखळी उपोषण सुरू होते. दुसऱ्या दिवशी दि.२७ रोजी जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाचे उपविभागीय अभियंता ठाकरे,शाखा अभियंता झगडे, लिपिक ठाकरे यांनी या ठिकाणी भेट देऊन चर्चा केली कांग्रेसच्या वतीने तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांच्या दुरूस्ती बाबत आंदोलनाच्या आज दुस-या दिवसी सुरवातीला नगरसेवक भारत जेठवानी विरोधी पक्षनेता न. पा. यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतीमेला हारार्पन केले. उपोषनकर्ते   बबनराव डाबेराव  उपाध्यक्ष जिल्हा कांग्रेस कमेटी, तालुकाध्यक्ष बाळासाहेब बाजड, रोहित सोळंके अध्यक्ष जिल्हा कांग्रेस सेवादल सोशल मिडीया, धिरज अग्रवाल माजी शहर अध्यक्ष,मो. शहाबुद्दीन अध्यक्ष विधानसभा युवक कांग्रेस, अशोक दुबे म. प्रदेश संघटन सचीव सेवादल , अनंत कुमार पांडेय शहर अध्यक्ष कांग्रेस सेवादल  , नागोराव तायडे  तालुका संघटन सचीव सेवादल, अमोल तातुरकर शहर अध्यक्ष सोशल मिडीया यांचा समावेश होता.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post