पुरातन काळी समाजकेंद्रीत सर्वसमावेशक वैभवशाली शिक्षण संस्कृतीने देशात सम्रुद्धी होती - कुलगुरू चांदेकर


मुर्तिजापूर :- छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊंंनी शिक्षणाचे धडे दिले, आपण मात्र शिक्षणाचे धडे गिरवतो. येणाऱ्या कार्यकाळात दोन हजार वर्षापर्यंत स्वामी विवेकानंदांचे साहित्य व प्रबोधन आपल्याला उपयोगी ठरणार आहे. शिकागो धर्म परिषदेत त्यांनी तेरा मिनिटांचे भाषण केले होते. त्या वेळेस त्यांचे वय ३६ वर्षे होतो. सहिष्णुता व सर्वसमावेशकता समाजाच्या चांगल्या गुणांचा समूह म्हणजे संस्कृती. नर सेवा हीच ईश्वरसेवा अशी शिकवण स्वामी विवेकानंदांनी दिली. वैभवशाली संस्कृती ही भारताची देण आहे. समाजव्यवस्था आणि त्याला अनुरूप शिक्षण व्यवस्था यामुळे पुरातन काळात संस्कृती आणि तिचे मूल्य जपल्या गेले. भारतातील आर्यभट्ट हे गणित तज्ञ होते. त्यांनी शून्याचा शोध लावला. कौटिल्याचे अर्थशास्त्र हे सर्वश्रुत आहे.ते तक्षशिला विद्यापीठाचे विद्यार्थी होत. पूर्वीच्या काळी शिक्षणात कौशल्य होतं. नैसर्गिक संसाधनाचा वापर करून निर्मिती केली जात होती. इसवी सन 300 वर्षा पूर्वी एक ग्रीस राजदूत भारतात आला होता. त्यावेळेस त्याने नमूद केले की सत्यवादीता आणि आदर्श व्यवसाय ही भारतीय लोकांसाठी सर्वश्रेष्ठ परंपरा आहे.हि शिकवण कोठून आली. हीच आपली पूर्वीची संस्कृती होती आणि ती शिक्षणातून व नितिमुल्यातुन आपल्याला मिळाली होती.पूर्वीची गुरुकुल शिक्षण पद्धती सर्वश्रेष्ठ अशी होती आता   कुलगुरू शिक्षण पद्धती आली. तेव्हाचे शिक्षण संस्कृती आणि मूल्य यांची जपणूक करण्यासाठी होते. आताचे शिक्षण रोजगारासाठी आहे. शिक्षण क्षेत्र सामाजिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचे असल्यामुळे शिक्षणाचा विषय चिंतेचा आहे.इसवी सन अकराव्या, बाराव्या शतकाच्या काळात विदेशी आक्रमण झाले, त्यावेळेस संतांचा उदय आपल्याकडे झाला. संतांमुळे साहित्य आणि संस्कृती टिकून राहिली. ब्रिटिशांनी मँकलेची शिक्षण पद्धती आणली. आणि तिथून आपल्या शिक्षणातील अधोगतीला सुरुवात झाली. त्यांनी मूल्यवान शिक्षण संस्कृती वर आघात करत कारकून जमात निर्माण करणारी शिक्षण व्यवस्था पेरली. आपली मूल्य आणि संस्कृती  हळूहळू त्यांनी शिक्षणातून घालवली. अद्यापही दुदैवाने असे म्हणावे लागते की आपण ते बदलू शकलो नाही. शिक्षण रोजगार मिळवण्याचे साधन नाही. पण आपण त्या दृष्टिकोनातून पाहतो. पूर्वी अंगाई गीत म्हटले जायचे, एकत्रित कुटुंब पद्धती होती, गुरू-शिष्य नाते होते. हे सर्व इंग्रजांनी संपुष्टात आणले. आता शिक्षणाला अवास्तव मानसिकतेतून अतिमहत्त्व दिल्या जात आहे. समाज केंद्रित शिक्षण पद्धती ऐवजी स्वकेंद्रित शिक्षण पद्धती निर्माण होत आहे. आताची शिक्षण पद्धती कितपत मनुष्य घडवू शकेल असा प्रश्न पडतो. आपल्या प्रत्येक शब्दात मंत्राची शक्ती आहे. कुठलीही वनस्पती अशी नाही की ज्या पासून औषध निर्माण होऊ शकत नाही. आणि कोणताच मनुष्य अयोग्य नाही, फक्त त्यांंचे कडुन योग्य काम करून घेता येणे महत्त्वाचे आहे.औपचारीक शिक्षण पद्धत मनुष्याला घडवू शकेल, समाजाला नाही असे विचार संत गाडगेबाबा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.मुरलीधर चांदेकर यांनी मूर्तिजापूर येथील राधा मंगलम येथे स्वामी विवेकानंद विचारमंच द्वारा स्वामी विवेकानंद जयंती निमित्त आयोजित तिन दिवसीय व्याख्यानमालेत "भारतीय शिक्षणाची समग्रता" विषयावर प्रारंभिक पुष्प गुंफतांना मांडले. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून प्राचार्य संजय देशमुख यांची उपस्थिती होती. या प्रारंभिक पुष्पा चे सूत्रसंचालन करुन आभार दाणी सर यांनी व्यक्त केले.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post