इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- उमरगा तालुक्यातील मुळज येथील कमलाकर ( महाराज) मुळे यांना मुंबई येथील ओबीसी फाऊंडेशनच्या वतीने 'महाराष्ट्ररत्न' पुरस्कार जाहीर झाला आहे.
कमलाकर (महाराज) मुळे हे वारकरी साहीत्य परीषदेचे उमरगा तालुका अध्यक्ष आहेत. यांनी गेल्या 20 वर्षापासुन उस्मानाबाद जिल्हयात किर्तन व प्रवचनाच्या माध्यमातुन समाजप्रबोधनाचे कार्य मोठ्या प्रमाणात करीत आहेत. यांना मुंबई आझाद मैदान येथील मराठी पत्रकार संघ येथे दि.12 डिसेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरव करण्यात येणार आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मुळे महाराज यांचे परिसरातुन सर्वस्तरातुन अभिनंदन करण्यात येत आहे.