श्री दत्तगुरुंच्या जन्मोत्सवानिमित्त गुरुचरित्र पारायण, भजन, कीर्तन सप्ताहाचे आयोजन


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- त्रिलोकीचे स्वामी गुरुदेव श्री दत्तात्रेय यांच्या जन्मोत्सवानिमित्त गुरुचरित्र पारायण, भजन व कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. उस्मानाबाद येथे पिताश्री श्रीमंतराव रणदिवे प्रतिष्ठाणतर्फे हा सप्ताह दि. १६ ते दि. २२ डिसेंबर च्या कालावधीत संपन्न होणार आहे.
उस्मानाबाद शहरातील शांतीनिकेतन येथे प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही श्री गुरुदेव दत्तात्रेय यांच्या जन्मोत्सवानिमित्त गुरुचरित्र पारायण, भजन व कीर्तन सप्ताह साजरा केला जात आहे. रविवारी (दि.१६) स.१० वा. श्री तुळजाभवानी मंदिराचे महंत प.पू.तुकोजी बुवा यांच्या हस्ते सप्ताहाचा शुभारंभ होणार आहे. दररोज सकाळी ९ ते १२.३० गुरुचरित्र पारायण, दु.२ ते ६ भजन होणार आहे. शनिवारी (दि.२२) स.८ वा. गुरुचरित्र ग्रंथदिंडी, स.१० वा. दारफळ (ता.उस्मानाबाद) येथील श्री संत कोकणे बुवा वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हभप योगेश इंगळे महाराज यांचे काला व गुलालाचे कीर्तन तर दु.१२.३० वा. श्री गुरुदेव दत्तात्रेय यांच्या जन्मोत्सव संपन्न होणार आहे. दु.१ पासून महाप्रसाद वाटप केला जाणार आहे. याा सप्ताह सोहळ्याचा भाविक-भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन लाभ घेण्याचे अवाहन पिताश्री श्रीमंतराव रणदिवे प्रतिष्ठाणचे अध्यक्ष धनंजय रणदिवे व परिवाराने केले आहे.
यांचे रंगणार भजन
सप्ताहाच्या शुभारंभदिनी रविवारी(दि.१६) मुक्ताई (गांधीनगर) व शोभण मंडळ (शांतीनिकेतन कॉलनी), सोमवारी(दि.१७) रुक्मीणी मंडळ(बँक कॉलनी), मंगळवारी(दि.१८) सखी ( यशवंत नगर), बुधवारी (दि.१९) संत जनाबाई (शांती निकेतन कॉलनी), गुरुवारी(दि.२०), श्री गजानन महाराज(पोस्ट कॉलनी), शुक्रवारी(दि.२१) ज्ञानेश्वर माऊली (गणेश नगर) व शनिवारी (दि.२२) सारोळा, काजळा येथील श्री रामानंद महाराज वारकरी शिक्षण संस्थेची भजन सेवा होणार आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post