इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लातूर येथील ज्येष्ठ विधीज्ञ अँड. आशिष बाजपेयी यांच्या मातोश्री मनोरमा बाजपेयी यांचे काही दिवसापूर्वीच दुःखद निधन झाले होते.
बाजपेयी यांच्या निवासस्थानी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी दि.7 डिसेंबर रोजी भेट देऊन त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले. याप्रसंगी अँड.आशिष बाजपेयी, जिल्हा मार्केटींग अधिकारी मनोज बाजपेयी (उस्मानाबाद), मनीष राठी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन अँड श्रीपतराव काकडे, रेणा साखर कारखान्याचे चेअरमन आबासाहेब पाटील जागृती साखर कारखान्याचे व्हॉईस चेअरमन लक्ष्मण मोरे, मांजरा साखर कारखान्याचे व्हॉईस चेअरमन श्रीशैल्य उटगे, संभाजी रेड्डी, सुपर्ण जगताप, सतीश पाटील, अदि उपस्थित होते.