तहसीलदार राहुल पाटील यांच्या हस्ते लोहारा तहसील कार्यालयात कचराकुंडी व स्वच्छता फलकाचे अनावरण लोहारा तहसील कार्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वान दिनाचे औचित्य साधुन दि.6 डिसेंबर रोजी तहसीलदार राहुल पाटील यांच्या हस्ते कचराकुंडी व स्वच्छता फलकाचे अनावरण करण्यात आले


तहसीलदार राहुल पाटील यांच्या हस्ते लोहारा तहसील कार्यालयात कचराकुंडी व स्वच्छता फलकाचे अनावरण
लोहारा तहसील कार्यालयात  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वान दिनाचे औचित्य साधुन दि.6 डिसेंबर रोजी तहसीलदार राहुल पाटील यांच्या हस्ते कचराकुंडी व स्वच्छता फलकाचे अनावरण करण्यात आले.
यावेळी नायब तहसीलदार रणजित शिराळकर,
सहाय्यक गटविकास अधिकारी डॉ.जास्मिन शेख, अदि, उपस्थित होते.
 लोहारा तहसील कार्यालयातील अव्वल कारकुन अशोक शिंदे यांनी दि.2 ऑक्टोंबर महात्मा गांधी यांच्या जयंतीपासुन माझे  कार्यालय स्वच्छ कार्यालय हा संकल्प घेवुन दररोज एक तास तहसील कार्यालय व
‌ कार्यालय परिसर स्वच्छ करण्याचे काम केले असुन सलग दोन महिने अखंडपणे चालु असलेल्या या स्वच्छता मोहिमेचा समारोप डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी करण्यात आला.
तहसील कार्यालयाचे अव्वल कारकुन अशोक शिंदे यांनी कार्यालय व परिसर स्वच्छ रहावा या, उद्देशाने तहसील कार्यालयात स्व:खर्चाने 5 कचराकुंडी ठेवल्या आहेत.
‌तहसील कार्यालय व कार्यालय परिसर स्वच्छ करण्यात आला असुन परत तो घान होणार  नाही याची जबाबदारी कर्मचारी व् नागरिक आपल्या सर्वांची असून परिसरात उघड्यावर कोणी ही घाण करु नये कचराकुंडीतच कचरा टाकावा,असे आवाहान तहसीलदार राहुल पाटील यांनी यावेळी  केले आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post