यवतमाळ :- ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे पार पाडलेल्या राज्यस्तरीय डान्स स्पर्धेत यवतमाळ शहरातील डी थ्री ग्रुपने झेंडा रोवला आहे. दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषीक प्राप्त झाल्याने त्यांना राष्ट्रीय डान्स स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. लवकरच राष्ट्रीय डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.
यवतमाळ शहरातील साधारणत: दहा ते बारा वर्षीय मुला, मुलींनी मिळून डी थ्री डान्स ग्रुप तयार केला. या डान्स ग्रुपला प्रशिक्षक म्हणून सचिन इंगोले, अतुल वेट्टी हे लाभले. या प्रशिक्षकांनी ग्रुपमधील मुला, मुलींना डान्सचे प्रशिक्षण दिले. या ग्रुपमध्ये दिव्यांशू क्रीष्णा पुसनाके, आर्यन आदमने, क्रीष्णा अहिर, आयुष्यमान फुके, सायली वावरे, पलक वनकर, आयुष्यी मेश्राम, ईश्वरी वाईकर आदीजण आहेत. या ग्रुपने यवतमाळ शहरासह विदर्भातील विविध डान्स स्पर्धेत सहभाग नोंदवून अनेक पारितोषीक मिळवली आहे. दरम्यान, विदर्भस्तरीय डान्स स्पर्धेतून पाच ग्रुपची राज्यपातळीवर डान्स स्पर्धेकरीता निवड झाली होती.
तद्नंतर ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे डान्स स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत राज्यभरातील विविध ग्रुप सहभागी झाले होते. यात यवतमाळच्या डी थ्री डान्स ग्रुपने वेगळी छाप पाडली. या स्पर्धेचे दुसरे पारितोषीक डी थ्री डान्स ग्रुपला मिळाले. त्यामुळे या ग्रुपची निवड राष्ट्रीय डान्स स्पर्धेकरीता झाली आहे. या यशाचे श्रेय प्रशिक्षक सचिन इंगोले, अतुल वेट्टी, क्रीष्णा पुसनाके, पुनम पुसनाके यांच्यासह आई-वडीलांना देत आहेत. डी थ्री डान्स ग्रुपचे जिल्ह्याभरात कौतुक केल्या जात आहे.