इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- उमरगा तालुक्यातील मुरुम कंटेकुर शिवारातील वसंतराव सिद्राम सुरवसे यांचे 1.5 एकर व नागेश सिद्राम सुरवसे यांचे 1 एकर या दोन
शेतकऱ्यांचे दि.7 डिसेंबर रोजी झालेल्या वादळी वाऱ्यात ज्वारीचे पिकाचे नुकसान झाले आहे. हि घटना संबधित शेतकरी मल्लीनाथ सुरवसे यांनी बसव प्रतिष्ठाण संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते रामलिंग पूराणे यांना संपर्क साधून सांगीतली. हि माहीती मिळाल्यानंतर रामलिंग पुराणे यांनी तात्काळ ही बाब तहसीलदार संजय पवार यांना सांगीतली. तहसीलदार संजय पवार यांनी तात्काळ पंचनामा साठी मुरूम चे तलाठी पवार यांना कळविले. त्यानुसार या शेतकऱ्यांचा ज्वारी पिक नुकसानीचा पंचनामा दि. 11 डिसेंबर रोजी करण्यात आला. या संबधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रामलिंग पुराणे यांनी केली आहे.