इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- मुरुम,येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात 26 वर्षापासून वाणिज्य व व्यवस्थापन विषयाचे सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत असणाऱ्या प्रा.सुधीर पंचगल्ले यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पीएच.डी.पदवी प्रदान केली.
परळी येथील वैद्यनाथ महाविद्यालयातील वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.शिवकुमार गिराम यांच्या मार्गदर्शनाखाली 'परफॉरन्स् इव्हॅल्युवेशन ऑफ मार्केट् कमिटीज इन उस्मानाबाद डिष्ट्रीक्ट' या विषयावर संशोधन प्रबंध विद्यापीठास सादर केला होता. बाह्य परिक्षक म्हणून जिंतूरचे डॉ.श्रीधर कोल्हे,अध्यक्षस्थानी विद्यापीठ विभाग प्रमुख प्रा.डॉ.फराह गौरी, डॉ. मुरलीधर लोखंडे, डॉ.विना हुंबे, डॉ.सय्यद अजरोद्दीन, डॉ.जयश्री सोमवंशी, डॉ.नंदकुमार राठी, डॉ.विलास इप्पर, प्राचार्य डॉ.श्रीकृष्ण चंदनशिवे, डॉ.संजय अस्वले, डॉ.एस.जी.बिराजदार, आदींच्या प्रमुख उपस्थितीत खुली परीक्षा पार पडली. त्यांनी वाणिज्य या विषयाच्या अध्यापनाबरोबरच उस्मानाबाद जिल्हा महाराष्ट्र पत्रकार संघाचे उपाध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांना पीएच.डी.पदवी मिळाल्याबद्ल त्यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन करण्यात येत आहे.