लोहारा/प्रतिनिधी :- विज बिल भरणा केंद्र शहरातील म.रा.वि.वि.कंपनी कार्यालयातच सुरु करण्यात यावे,अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष आयुब हबीब शेख यांनी उपअभियंता यांना दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, लोहारा शहरात म रा वि वि कंपनीचे लाईट बील भरणा केंद्र यापुर्वा कार्यालयात सुरु होते. हे बिल भरणा केंद्र येणेगुर येथे स्थलांतर करण्यात आले आहे. लोहारा हे तालुक्याचे ठिकाण असुन या ठिकाणी संपुर्ण खेडे गावाचे लोक ये-जा करतात. त्याला पर्याय म्हणुन आपण डाँ बाबासाहेब आंबेडकर मल्टीस्टेट बँकेस बिल भरणा केंद्राची परवानगी दिली आहे. तरी त्या बँकेत ग्राहकांना बँकेत खाते काढुन घेतल्यानंतरच लाईट बिल भरून घेण्यात येईल असे सांगितले जात आहे. तरी 100 रु बिल भरणासाठी ग्राहकांना बँकेत खाते काढुन 1000/- रु गुंतवावे लागेल.
असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष आयुब हबीब शेख, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस शब्बीर गवंडी, नगरसेवक आयुब अब्दुल शेख, युवक तालुकाध्यक्ष पृथ्वीराज जगताप, युवक शहराध्यक्ष निहाल मुजावर, महेबुब फकिर, हेमंत माळवदकर, सलीम कुरेशी, आमीन कुरेशी, आशपाक
शेख, ताहेर पठाण, महंमद खड़ीवाले, सद्दाम मुलानी आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.